शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चीनला न जुमानता सैन्याचे सीमेवर तंबू सैनिकांना रसदपुरवठा करण्याचीही तयारी

By admin | Updated: July 10, 2017 05:55 IST

चीनच्या धमक्यांना न जुमानता सिक्कीम सीमेवरील डोकलाम भागात दीर्घकाळ घट्ट पाय रोवून राहण्याची तयारी भारताने केली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चीनच्या धमक्यांना न जुमानता सिक्कीम सीमेवरील डोकलाम भागात दीर्घकाळ घट्ट पाय रोवून राहण्याची तयारी भारताने केली असून, सैन्याने सीमेवर तंबू ठोकले आहेत. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी जोपर्यंत आपल्या सैनिकांना परत बोलवत नाही तोपर्यंत येथून हटणार नसल्याचे संकेतच भारताने यानिमित्ताने दिले आहेत. भारतीय सैन्याने ही भूमिका घेतली असताना चीननेही तडजोड करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सिमेवरील तणाव वाढला आहे. भारत, चीन आणि भूतानच्या सीमा एकत्र येतात त्या डोकलाम भागावरून हा वाद सुरू आहे. या ठिकाणाहून भारताने सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी चीन करीत आहे. त्यामुळे सिक्कीम सेक्टरमध्ये १० हजार फूट उंचीवरील या भागात तणाव वाढत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सैनिकांना रसदपुरवठा करण्याचीही सोय करण्यात आली आहे. भारतीय सैन्य चीनच्या कोणत्याही प्रकारच्या दबावात नसल्याचे हे संकेत आहेत. या वादावर राजनयिक तोडगा काढण्याचा आत्मविश्वासही व्यक्त केला जात आहे. >इशारे आणि धमक्या भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढत असताना संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की, भारताची परिस्थिती आता १९६२ पेक्षा वेगळी आहे. त्यावर चीननेही प्रतिक्रिया देत स्पष्ट केले होते की, चीनही पूर्वीसारखा राहिलेला नाही, याची भारताने दखल घ्यावी. डोकलाम भागात चीनने रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर या भागात तणाव वाढला आहे. या भागाला भारतात डोका ला नावाने संबोधले जाते. चीन याला आपला डोंगलांग भाग असल्याचे सांगत आहे. ३,४८८ कि.मी.च्या भारत-चीन सीमेपैकी २२० कि.मी.चा भाग सिक्कीमला लागून आहे. काय आहे वाद? : डोकलाममध्ये चीन रस्त्याचे काम करत आहे. याच भागात भारत, चीन आणि भूतानच्या सिमा आहेत. भूतान व चीन या भागावर दावा करत आहेत. या वादात भारत भूतानच्या बाजूने आहे. त्यामुळे चीनचा संताप झाला आहे. यंत्रणा आतापर्यंत निष्फळ : चीन आक्रमकपणे सांगत आहे की, आपण कोणत्याही तडजोडीसाठी तयार नाहीत आणि चेंडू भारताच्या कोर्टात आहे. येथील सुरक्षाव्यवस्थेचे असे मत आहे की, तणाव कमी करण्यासाठी एकतर्फी दृष्टिकोन असून चालत नाही. सीमा वाद सोडविण्यासाठी २०१२ मध्ये दोन्ही देशांनी एका यंत्रणेवर सहमती दर्शविली होती; परंतु ही यंत्रणा आतापर्यंत निष्फळ ठरलेली आहे. तीन आठवड्यांपासून येथे तणाव आहे.