शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिकआधीच सुरक्षाप्रमुखांची उडाली झोप

By admin | Updated: August 3, 2015 00:13 IST

नाशिक : गोदाघाटावर दर बुधवारी भरणारा आठवडे बाजार आणि रोज होणारी मांसविक्री दि. ५ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर २०१५ या दोन महिन्यांच्या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी जाहीर केला आहे. भाविकांची सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिकेने सदर निर्णय घेतला आहे.येत्या १९ आॅगस्टला साधुग्राममध्ये आखाड्यांचे ध्वजारोहण होणार असून, त्यानंतर पहिली ...

नाशिक : गोदाघाटावर दर बुधवारी भरणारा आठवडे बाजार आणि रोज होणारी मांसविक्री दि. ५ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर २०१५ या दोन महिन्यांच्या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी जाहीर केला आहे. भाविकांची सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिकेने सदर निर्णय घेतला आहे.येत्या १९ आॅगस्टला साधुग्राममध्ये आखाड्यांचे ध्वजारोहण होणार असून, त्यानंतर पहिली पर्वणी २९ आॅगस्टला होत आहे. रामकुंडावर पुरोहित संघाच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे गोदाघाट परिसराची स्वच्छता ठेवण्यावर महापालिकेकडून प्राधान्याने भर दिला जात आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी शाही मार्गाची पाहणी करतेवेळी गोदाघाटावर भरणारा मांस, मच्छी आणि बोंबील बाजार बंद करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महापालिकेने स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने दि. ५ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी गोदाघाटावर दर बुधवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय घाटावर रोज भरणारा मांस, मच्छी आणि बोंबील बाजारही बंद ठेवण्यात येणार आहे. गंगाघाट परिसर, म्हसोबा पटांगण तसेच गौरी पटांगणावर दोन महिने कुणालाही भाजीविक्री अथवा मांसविक्री करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. नाशिक येथे १८ सप्टेंबरला तर त्र्यंबकेश्वर येथे २५ सप्टेंबरला अखेरची पर्वणी आहे. तोपर्यंत आठवडे बाजार भरणार नाही. बुधवार, दि. ७ आॅक्टोबरलाच आता आठवडे बाजार भरणार आहे. (प्रतिनिधी)४स्वच्छतेसाठीनिर्माल्य कलशमहापालिकेमार्फत गोदाघाटावर स्वच्छतेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जात आहे. रामघाटावर सुमारे ६० निर्माल्य कलश ठेवण्यात आले असून, भाविकांनी या कलशातच निर्माल्य टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर पटांगणालगत असलेल्या स्वच्छतागृहाच्या मागील जागेत घाण-कचरा टाकणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार असून, संबंधितांवर लक्ष ठेवण्यात येणार आले.