शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आमदार येण्यापूर्वीच महानगर भाजपाचा जल्लोष सुरेश भोळे यांनी व्यक्त केली नाराजी : खच्चीकरण केले जात असल्याचा केला आरोप

By admin | Updated: May 23, 2016 00:41 IST

जळगाव : महसूलमंत्री तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांना दाऊदशी संपर्कात असल्याच्या आरोपात क्लिनचिट मिळाल्याचा आनंदोत्सव रविवारी भाजपातर्फे जिल्हाभरात साजरा झाला. मात्र महानगर भाजपातर्फे आमदार सुरेश भोळे यांनी अन्य कार्यक्रमात असल्याने पाच-दहा मिनिटांत येत असल्याचे कळवूनही वाट न पाहता आनंदोत्सव साजरा केल्याने आमदार चिडले. जिल्हाध्यक्षांसमोरच माजी महानगराध्यक्षांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

जळगाव : महसूलमंत्री तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांना दाऊदशी संपर्कात असल्याच्या आरोपात क्लिनचिट मिळाल्याचा आनंदोत्सव रविवारी भाजपातर्फे जिल्हाभरात साजरा झाला. मात्र महानगर भाजपातर्फे आमदार सुरेश भोळे यांनी अन्य कार्यक्रमात असल्याने पाच-दहा मिनिटांत येत असल्याचे कळवूनही वाट न पाहता आनंदोत्सव साजरा केल्याने आमदार चिडले. जिल्हाध्यक्षांसमोरच माजी महानगराध्यक्षांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
पालकमंत्री खडसेंना क्लिनचिट मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्षांसह सर्व शहरातील कार्यकर्ते भाजपा कार्यालयात सकाळी १० वाजता एकत्र जमले व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करणार होते. महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांना उशीर होणार असल्याने कार्यक्रमाची वेळ अर्धातास लांबणीवर टाकण्यात आली. मात्र आमदार भोळे हे एका कार्यक्रमात असल्याने त्यांनी पाच-दहा मिनिटांत येतो असे कळविले. मात्र जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर अशोक लाडवंजारी व महानगर भाजपातील कार्यकर्ते पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देण्यासाठीही निघून गेले. त्यानंतर आमदार भोळे भाजप कार्यालयात पोहोचले. आपली प्रतीक्षा न करताच कार्यक्रम आटोपून टाकल्याचे पाहून ते चिडले. लाडवंजारी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच तेथे उपस्थित जिल्हाध्यक्ष वाघ यांनाही आपले खच्चीकरण केले जात असल्याची नाराजी व्यक्त केली.
-------
तुम्हालाच कार्यकर्ते सांभाळता येत नाही
आमदार भोळे यांनी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासमोरच तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच आपले खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप केला. त्यावर वाघ यांनी तुम्हालाच कार्यकर्ते सांभाळता येत नसल्याचे सुनावले.
--------
असा कोणताही प्रकार माझ्यासमोर घडलेला नाही. सर्व कार्यकर्ते एक झाले आहेत. भाजपा एक आहे. सर्वांचे नेते एकनाथराव खडसे हेच आहेत. मोठा पक्ष असल्याने प्रत्येकाची मते वेगळी असली तरीही मतभेद नाहीत.
-उदय वाघ,
जिल्हाध्यक्ष, भाजपा


ब्राšाणसभेत कार्यक्रम होता. तेथून भाजप कार्यालयात जाण्यास उशीर झाला. मात्र असा कोणताही प्रकार घडलेला नाही. तसेच नाराजीही व्यक्त केलेली नाही.
-सुरेश भोळे,आमदार, भाजपा