नाशिक : पंचवटी येथील संत सेनाजी मंदिरात ७ दिवस भागवत कथेच्या निरुपणाचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते १६ एप्रिल पर्यंत चालणार्या या निरुपणात भागवत कथेचे जीवनातील महत्व आणि भागवताच्या माध्यमातून ईश्वर प्राप्तीचा मार्ग यावर प. पु.ऋषीकेश महाराज पुरी भक्तांना मार्गदर्शन करत आहेत.प्रपंच हे शरीराचे जीवन आहे. शरीरास लागणारे सर्व पदार्थ व वस्तू मिळविण्याचे काम प्रपंच करतो. परमार्थ हे जीवनाचे साधन आहे.भगवंताची ओढ लागेल एक जीव कृष्ण साधनेच्या धुंदीत आपली वाटचाल कशी करतो हेच या भागवत प्राप्तीचे सत्य आहे. भागवत धर्माची गोडी आपण आपल्या जीवनात घ्यावी आणि आपले जीवन प्रेममय असे प्रतिपादन ऋषीकेश महाराज पुरी यांनी केले. संत सेनाजी महाराज मंदिरात सुरू असलेल्या भागवत कथेच्या निरुपणात ते बोलत होते.भागवत कथेत वामन अवतार, राम जन्म, कृष्ण जन्म, गोवर्धन पूजा, रुक्मिणी स्वयंवर आदी जिवंत देखावे साकारण्यात येणार आहेत. शेवटच्या दिवशी भागवत ग्रंथाची शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कथेचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्रीमती बेबीताई टाक यांनी केले आहे. या कार्यक्रमाला राजेंद्र टोकसिया, विजया टोकसिया, जंगल टाक, रवि साखला, किशोर जोशी, कैलास जोशी, संतीश टाक, गिरीश टाक आदींनी केले.----
भागवत कथेत जीवनाचे सार : ऋषीकेश महाराज
By admin | Updated: April 15, 2016 23:00 IST