शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

इरॉम शर्मिलाचे उपोषण संपणार

By admin | Updated: July 27, 2016 02:22 IST

मणिपुरातून सुरक्षा दलांना विशेषाधिकार देणारा कायदा (आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर अ‍ॅक्ट) मागे घेण्यात यावा, यासाठी २000 सालपासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या इरॉम शर्मिला यांनी

इम्फाळ : मणिपुरातून सुरक्षा दलांना विशेषाधिकार देणारा कायदा (आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर अ‍ॅक्ट) मागे घेण्यात यावा, यासाठी २000 सालपासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या इरॉम शर्मिला यांनी मंगळवारी अखेर आपले उपोषण मागे घेणार असल्याचे जाहीर केले. उपोषणाने प्रश्न सुटणे आजच्या स्थितीत अवघड आहे, असे लक्षात आल्यामुळे आपण हा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.त्या ९ आॅगस्ट रोजी उपोषण मागे घेणार आहेत. आपण आता विधानसभेची निवडणूक लढवणार असून, हा कायदा रद्द करण्यात यावा, अशी आपली मागणी आहे आणि त्या मागणीसाठी यापुढेही आपण लढत राहणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. मणिपूरमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. इरॉम शर्मिला या ४४ वर्षांच्या असून, त्यांनी आता विवाह करण्याचेही जाहीर केले आहे. त्यांनी नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या जन्माने भारतीय आणि ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलेल्या आपल्या मित्राबरोबरच विवाह करणार असल्याचे जाहीर केले.त्या उपोषण सोडत नसल्यामुळे आणि काहीही खायला वा प्यायला नकार देत असल्याने आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यांना अनेकदा पोलिसांनी अटकही केली होती. म्हणून केले होते उपोषणमणिपूरमधील घुसखोरी थांबवण्यासाठी तिथे लष्कर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आफ्स्पा कायद्यामुळे लष्कराला मिळालेल्या अमर्याद अधिकारांतून तेथील सामान्य जनतेवर अनन्वित अत्याचार होत असल्याच्या खूप तक्रारी होत्या.केवळ संशयामुळे कोणाच्या घरात घुसणे, कोणालाही ताब्यात घेणे, अतिरेकी ठरवून मारून टाकणे, असे प्रकार लष्कराने केल्याचा आरोप होत होते. त्यातच मालोम बसस्टॉपवर उभ्या असलेल्या १0 स्थानिक रहिवाशांना आसाम रायफलच्या जवानांनी ठार करून, ती चकमक असल्याचे दाखवले होते.