शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर; पीएफवरचा व्याजदर सरकार वाढवणार, सहा कोटी कर्मचाऱ्यांना फायदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 05:27 IST

सहा कोटी सदस्यांना लाभ : तीन वर्षात पहिल्यांदाच वाढीचा विचार

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधीवरील (ईपीएफ) व्याजदर २०१८-१९ या वर्षासाठी वाढवून ८.६५ टक्के करण्यात येणार असून, यासंबंधीची अधिसूचना श्रम मंत्रालयाकडून लवकरच जारी केली जाईल, असे केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले. या निर्णयाचा सहा कोटी सदस्यांना फायदा होणार आहे. २०१७-१८ या वर्षासाठी ईपीएफवर ८.५५ टक्के व्याज दिले गेले होते.

फिक्कीने आयोजित केलेल्या खाजगी सुरक्षारक्षकांवरील परिषदेच्या पार्श्वभूमीवर गंगवार यांनी पत्रकारांना सांगितले की, २०१८-१९ या वित्त वर्षासाठी ईपीएफचा व्याजदर वाढवून ८.६५ टक्के करण्यास वित्त मंत्रालयाने नाकारलेले नाही. यासंबंधीचा निर्णय लवकरच अधिसूचित केला जाईल, असा मला विश्वास आहे.

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय फेब्रुवारीमध्येच घेतला आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांत पहिल्यांदाच ईपीएफचा व्याजदर वाढविण्यात येत आहे. श्रममंत्री विश्वस्त मंडळाचे नेतृत्व करतात. विश्वस्त मंडळाच्या निर्णयास वित्तमंत्रालयाची एक शाखा असलेल्या वित्तीय सेवा विभागाने एप्रिलमध्ये सहमती दर्शविली. वित्तमंत्रालयाच्या सहमतीनंतर प्राप्तिकर विभाग आणि श्रममंत्रालय यांनी व्याजदर अधिसूचित करणे आवश्यक आहे. निर्णय अधिसूचित झाल्यानंतर ईपीएफओ आपल्या १३६ क्षेत्रीय कार्यालयांच्या नावे आदेश काढून व्याज सदस्यांच्या खात्यावर जमा करण्यास सांगेल.१५१ कोटींची शिल्लकईपीएफओच्या अंदाजानुसार, २०१८-१९ या वर्षात ८.६५ टक्के दराने व्याज दिल्यानंतर १५१.६७ कोटी रुपये संघटनेच्या कोषात शिल्लक राहतील. ८.७ टक्के दराने व्याज दिल्यास मात्र संघटनेला १५८ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागेल. त्यामुळे संघटनेने ८.६५ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे.