शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील शाळेत अर्जावर 'भारत माता की जय' लिहिलं तरच प्रवेश

By admin | Updated: April 4, 2016 10:59 IST

अमरेली येथील श्री पटेल विद्यार्थी आश्रम ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेने या प्रकरणात विद्यार्थ्यांना खेचून वेगळेच वळण दिलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
अहमदाबाद, दि. ४ - 'भारत माता की जय' बोलण्यावरुन देशभरात वाद-विवाद सुरु असताना गुजरातमध्ये या प्रकरणाने वेगळेच वळण घेतलं आहे. अमरेली येथील श्री पटेल विद्यार्थी आश्रम ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेने या प्रकरणात विद्यार्थ्यांना खेचल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. ज्या विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे त्यांना अर्जावर 'भारत माता की जय' लिहावं लागणार आहे अन्यथा त्यांना प्रवेश मिळणार नाही असं सांगण्यात आलं आहे. भाजपा नेता दिलीप संघानी हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. 
 
अमरेलीमध्ये श्री पटेल विद्यार्थी आश्रम ट्रस्टचे संस्थेचं प्राथमिक विद्यालिय, दोन हायस्कूल आणि कॉलेज आहे. सध्या या संस्थेत 4500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रविवारी झालेल्या संस्थेच्या बैठकीत हा अजब निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात येण्यासाठी दिलीप संघानी यांनी हा निर्णय घेतला गेल्याचा आरोप इतर पक्षातील राजकीय नेते करत आहे. दिलीप संघानी यांना याबाबत विचारले असता 104 वर्ष जुन्या संस्थेकडून विद्यार्थ्यांना देशभक्तीची प्रेरणा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. 
 
'सध्या जेव्हा शैक्षणिक कॅम्पसमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या जात आहेत त्यावेळी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांनी देशाचा आदर करावा अशी अपेक्षा करतो. त्यामुळे आम्ही अर्जावर 'भारत माता की जय' लिहिणा-यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्यसैनिक मोहन वीरजी पटेल यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. अशाप्रकारचा देशभक्तीचा वारसा असणा-या या संस्थेची विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत करणे जबाबदारी आहे. येणा-या टर्मसाठी हा नियम लागू असणार आहे. जे विद्यार्थी अर्जावर 'भारत माता की जय' लिहिणार नाहीत त्यांना प्रवेश मिळणार नाही', असं दिलीप संघानी यांनी सांगितलं आहे. 
 
राज्यशिक्षण मंत्री भुपेंद्रसिंग चुडासमा यांनी अशाप्रकारे कोणीही जबरदस्ती करु शकत नसल्याचं म्हंटलं आहे. हा एका संस्थेचा वैयक्तिक निर्णय आहे. याचा भाजपाशी काही संबंध नाही. भारत माता की जय म्हणणं ही चांगली गोष्ट आहे मात्र त्याची सक्ती केली जाऊ शकत नाही. मला याप्रकरणी कोणतीच तक्रार आलेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हक्कांचं उल्लंघन झालं आहे क नाही ? असं  भुपेंद्रसिंग चुडासमा बोलले आहेत.