शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

वासुंदेत स्वातंत्र्यदिन उत्साहात

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

वासुंदे : वासुंदे (ता. दौंड) परिसरातील हिंगणीगाडा, रोटी येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

वासुंदे : वासुंदे (ता. दौंड) परिसरातील हिंगणीगाडा, रोटी येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वासुंदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री गुरुकृपा माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची गावातील प्रमुख मार्गावरून प्रभातफेरी काढण्यात आली. या वेळी भारतमाता की जय, वंदे मातरम् आदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. वासुंदे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील ध्वजारोहण गावच्या उपसरपंच मनीषा जांबले, तलाठी कार्यालयाचे ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य दिलीप जगताप, श्री गुरुकृपा विद्यालयाचे ध्वजारोहण कमांडर विक्रम जगताप व जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण सरपंच मीना जांबले यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणावर विद्यार्थ्यांच्या सामूहिक कवायतीने उपस्थितांची मने जिंकली. या वेळी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन त्यांना सन्मानचिन्ह, रोख बक्षीस व खाऊचे वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर हिंगणीगाडा व रोटी परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून सामूहिक झेंडावंदन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या भाषणांचे व बक्षीस वितरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

फोटो ओळ : स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमामत सामूहिक कवायत करताना वासुंदे (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व गुरुकृपा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी.
(छायाचित्र : गोरख जांबले)
18082015-िं४ल्लि-21
--------------------------------
०००००