शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातील मदरशांत इंग्रजी सक्तीची!

By admin | Updated: July 8, 2015 02:53 IST

मदरशांमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान या मूलभूत शिक्षणावरून काहूर माजले असतानाच उत्तर प्रदेश मदरसा बोर्डाने ५ हजार मदरशांमधून इंग्रजी विषयाच्या सक्तीची मंगळवारपासून अंमलबजावणीही सुरू केली.

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीमहाराष्ट्रात मदरशांमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान या मूलभूत शिक्षणावरून काहूर माजले असतानाच उत्तर प्रदेश मदरसा बोर्डाने ५ हजार मदरशांमधून इंग्रजी विषयाच्या सक्तीची मंगळवारपासून अंमलबजावणीही सुरू केली. त्याच वेळी हिंदी हा ऐच्छिक विषय ठरविला आहे. अभ्यासक्रमातील मूलभूत प्रचलित विषय न शिकविणाऱ्या मदरशांना ‘शाळाबाह्य’ वर्गवारीत टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने अलीकडेच जाहीर केला आहे.गणित हा विषय उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये गेल्या वर्षीपासून शिकविला जातो. शिक्षणाचे माध्यम अरबी असो की फारसी, साऱ्यांनाच इंग्रजीची सक्ती करण्यात आली असून, कोणताही विरोध न करता ती तेथील मदरशांनी स्वीकारली.महाराष्ट्रात ज्या विषयांवरून टीका झाली, ते इंग्रजी व गणित हे दोन्ही विषय उत्तर प्रदेशात शिकविले तर जातातच; शिवाय हिंदी, उर्दू व संगणकीय अभ्यासक्रम शिकविण्यास सुरुवात केली असून, मदरशांतील शिक्षणातून नोकरीच्या संधी कमी उपलब्ध होत असल्याने इंग्रजी शिकविणे आवश्यक असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. उत्तर प्रदेशात १६ हजार मदरसे आहेत. पैकी ५ हजार बोर्डाशी संबंधित असून, त्यांना सरकारकडून अनुदान दिले जाते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रात मदरसा बोर्ड नाही. मात्र १,८८९ मदरशांमधून १ लाख ४८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. न्या. सच्चर समितीने केलेल्या शिफारशींमुळे मदरशांना डॉ. जाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत दरवर्षी अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला होता. राज्यातील ४३० मदरशांनी अनुदानासाठी अर्ज केले होते, त्यातील २०० अर्ज मान्य करण्यात आले होते.अखिलेश सरकार मदरशांतील शिक्षणाबाबत आग्रहीमदरशांमधील मुन्शी, मौलवी, आलिम या शिक्षणाला सरकारने मान्यता दिली आहे. मात्र कामिल (बीए) व फाजिल (पदव्युत्तर) पदवीसाठी आम्ही आग्रही आहोत. कामिल व फाजिल शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख बनवायचे आहे. - जैनुद साजदिन, मदरसा बोर्डाचे अध्यक्षमुस्लिमांची संख्या लक्षणीय असतानाही उत्तर प्रदेशचे अखिलेश सरकार मदरशांतील शिक्षणाबाबत आग्रही आहे. मदरशांतून उच्च माध्यमिक शिक्षण दिले जाते, त्याला मान्यताही आहे. पण कामिल (बीए) व फाजिल (पदव्युत्तर) पदवीसाठी विद्यापीठाची मान्यता लागते. बसपा सरकारने मान्यता मिळविण्यास काही विद्यापीठांशी संपर्क साधला होता. आता काही विषय बदलून मान्यता देण्याबाबत समाजवादी सरकार प्रयत्नशील असल्याचा शिक्षक संघटनांचा दावा आहे.