शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी शिक्षण देशभक्ती व माणुसकी शिकवू शकत नाही - मोहन भागवत

By admin | Updated: December 7, 2015 09:49 IST

मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देऊन त्यांना देशभक्ती व माणुसकी शिकवता येत नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले आहे

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ७ - मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देऊन त्यांना देशभक्ती व माणुसकी शिकवता येत नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले आहे. संघाचे संस्थापक के.बी. हेडगेवार यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनानंतर ते गोव्याच्या राजधानीत बोलत होते. 
इंग्रजीत शिक्षण घेतल्यामुळे आपण पोटा-पाण्यापुरते कमविण्यास पात्र बनतो. हे स्वामी विवेकानंद यांचेच शब्द आहेत. पण आपल्याला अशा शाळांची गरज नाहीये.  एक चांगला माणूस बनून इतरांची सेवा करण्यास शिकवेल, अशा शाळांची आपल्याला गरज आहे असे भागवत म्हणाले. वीर सावरकर यांच्यानुसार, आपल्याला मिळालेल्या विद्येमुळे, शिक्षणामुळे जर आपण देशाचं भलं करू शकत नसू तर आपलं शिक्षण व्यर्थ आहे, असेही भागवत यांनी सांगितले. 
यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांच्यासह गोवा युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर आणि अनेक अधिकारी उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणा-या भाषेसंबंधी सरकारतर्फे घेण्यात येणा-या निर्णयावर  भागवत यांच्या भाषणामुळे काहीही फरक पडणार नाही, असे पारसेकर यांनी स्पष्ट केले.