इगतपुरी : येथील वंडरलँड इंग्लिश मेडीयम स्कुल स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी यावेळी हिंदी मराठी चित्रपटासह, लोकगीते, देशभक्ती गीतांवर नृत्य करत प्रेक्षकांचे लक्ष वेधुन घेतले.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी रमेश गावित, उपनगराध्यक्षा रत्नमाला जाधव, प्राचार्या आल्यिा परेश, किश परश, कादर सानिया, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी राजलक्ष्मी रंजन उपस्थित होते.आमदार निर्मला गावित यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनील आहेर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष किश परेश यांनी तर आभार तरबेज सैय्यद यांनी मानले.फोटोइगतपुरी येथील वंडर लँड शाळेच्या स्नेहसंमेलनात वधर्मसमभाव टीका सादर करतांना विद्यार्थी.
वंडरलँड शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
By admin | Updated: March 21, 2015 00:10 IST