शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दस्तऐवज नोटरी करण्याऐवजी स्व-साक्षांकनास प्रोत्साहन द्या!

By admin | Updated: July 16, 2014 02:01 IST

विविध सरकारी कामांसाठी लागणाऱ्या दस्तऐवजांचे नोटरीकडून अथवा राजपत्रित अधिकाऱ्याकडून साक्षांकन करून घेण्याऐवजी अर्जदाराने अशा दस्तऐवजांचे स्व-साक्षांकन

नवी दिल्ली : विविध सरकारी कामांसाठी लागणाऱ्या दस्तऐवजांचे नोटरीकडून अथवा राजपत्रित अधिकाऱ्याकडून साक्षांकन करून घेण्याऐवजी अर्जदाराने अशा दस्तऐवजांचे स्व-साक्षांकन (सेल्फ अ‍ॅटेस्टेशन) करण्याच्या पद्धतीस प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारने ठरविल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.दस्तऐवज नोटरीकडून किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांकडून साक्षांकित करून घेण्याच्या सध्याच्या नियमांचा फेरआढावा घ्यावा आणि शक्य असेल तेथे स्व-साक्षांकनाची सोय करावी, असे केंद्र सरकारने राज्यांना कळविले असल्याचे केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि लोकगाऱ्हाणी विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.हा अधिकारी म्हणाला की, दस्तऐवज साक्षांकित करून घेणे किंवा त्यांच्या पुष्ट्यर्थ प्रतिज्ञापत्र करून घेणे हे फार वेळकाढू व किचकट काम आहे. नोटरीकडून साक्षांकन करून घेण्यासाठी लोकांना १०० ते ५०० रुपये खर्च करावे लागतात. शिवाय ताडून पाहण्यासाठी पुरेशी व सर्व मूळ कागदपत्रे हजर केल्याशिवाय बहुतांश राजपत्रित अधिकारी साक्षांकन करीत नाहीत. ग्रामीण भागांत व दुर्गम भागांमध्ये तर लोकांची खूपच अडचण होते. त्यामुळे राज्य सरकारांनी स्व-साक्षांकनाला प्रोत्साहन दिले तर नागरिकांची खूपच सोय होईल, असेही हा अधिकारी म्हणाला. या संदर्भात उपर्युक्त केंद्रीय विभागाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठविलेल्या आॅफिस मेमोमध्ये म्हटले आहे की, लोकांना सरकारी कामांसाठीच्या अर्जांसोबत सुरुवातीस स्व-साक्षांकित दस्तऐवज सादर करू दिले जावेत व सरते शेवटी मूळ कागदपत्रे सादर करण्यास सांगून साक्षांकित दस्तावेजांची सत्यता पडताळून पाहिली जाऊ शकेल. स्व-साक्षांकनाची पद्धत लोकोपयोगी असून राजपत्रित अधिकारी किंवा नोटरीकडून साक्षांकन करून घेण्याला खर्च येतो, एवढेच नाही तर हे करण्यासाठी नागरिक व राजपत्रित अधिकाऱ्यांचा वेळही वाया जातो. मात्र ज्या कामांसाठी नोटरी केलेले दस्तऐवज सादर करणे कायद्यानेच बंधनकारक असेल अशा कामांसाठी स्व-साक्षांकनाची पद्धत लागू केली जाऊ शकत नाही, असे या मेमोमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)