शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना ऑनलाईन कळेल निवृत्ती वेतनाची रक्कम

By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST

ईपीएफओ : वेबसाईटवर लवकरच होणार सोय

ईपीएफओ : वेबसाईटवर लवकरच होणार सोय
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे (ईपीएफओ) लवकरच आपल्या सदस्यांसाठी (कर्मचारी) वेबसाईटवर निवृत्ती वेतनाची रक्कम किती आहे हे बघण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पेन्शन निधीत किती रक्कम जमा केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला किती निवृत्ती वेतन मिळेल, हे सुद्धा याद्वारे कळणार आहे.
केंद्रीय भविष्य निधी आयुक्त के.के. जालान यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ईपीएफओतर्फे वेगवेगळ्या सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असून एखाद्या सदस्याला किती निवृत्ती वेतन मिळेल हे सुद्धा या माध्यमाने कळू शकेल. निवृत्ती वेतनाची गणना करण्यासाठी किमान पाच आणि जास्तीतजास्त दहा उदाहरणे वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येतील. या आधारे कर्मचारी स्वत: आपल्या निवृत्ती वेतनाचा हिशेब तयार करू शकेल.
कर्मचाऱ्याच्या एकूण उत्पन्नातून (ग्रॉस सॅलरी) भविष्य निधी (पीएफ) कपातीचा मुद्दा तूर्तास सरकारकडे विचारार्थ प्रलंबित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी संसदेत कायदा दुरुस्ती करावी लागणार आहे.
डिजिटल सप्ताह सुरू
ईपीएफओने सोमवारी आपला डिजिटल सप्ताह सुरू केला. केंद्रीय कामगार आणि रोजगार विभागाचे सचिव शंकर अग्रवाल यांनी सप्ताहाचे उद्घाटन केले. याचवेळी संघटनेच्या नव्या डिझाईनमधील वेबसाईटचाही शुभारंभ करण्यात आला. ईपीएफओची योग्य दिशेने आगेकूच सुरू असल्याचे अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, आता प्रत्येक महिन्याला पीएफ खाते अपडेट केले जाते. नियोक्त्याने त्याच्यावतीने योगदान दिले की नाही हे कर्मचाऱ्याला सहज कळू शकेल. ईपीएफओची व्याप्ती जास्तीतजास्त वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
संघटनेकडून डिजिटल सेेवेच्या माध्यमाने ईपीएफ योजना वर्ष १९५२, कर्मचारी निवृत्ती वेतन योजना १९९५ आणि कर्मचारी विमा योजना १९७६ ची माहिती देण्यात येईल. ई-गव्हर्नन्सकडून एम-गव्हर्नन्सकडे संघटनेची वाटचाल सुरू आहे. (प्रतिनिधी)