शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारवर कर्मचाऱ्यांचा दबाव

By admin | Updated: July 5, 2016 04:20 IST

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींबाबत नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केलेला निर्णय लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मान्य नाही. देशातले ४७ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ५0 लाख पेन्शनर्समधे सरकारचा

- सुरेश भटेवरा , नवी दिल्ली

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींबाबत नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केलेला निर्णय लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मान्य नाही. देशातले ४७ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ५0 लाख पेन्शनर्समधे सरकारचा निर्णय फील गुड वातावरण निर्माण करेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात हा निर्णय प्रत्यक्षात केंद्र सरकारच्या अंगलट आला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी या निर्णयाच्या विरोधात ११ जुलै रोजी देशव्यापी संप करण्याची धमकी दिल्यानंतर, मोदी सरकार दबावाखाली आले असून, कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाशी सरकारने सोमवारी झटपट चर्चेला सुरुवात केली. निर्णय घेण्यासाठी सरकारकडे आता अवघे सहा दिवस उरले आहेत. या काळात वाटाघाटींना कोणते मूर्त स्वरूप मिळते, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.प्राथमिक बैठकीनंतर प्रतिनिधी मंडळातले एक कर्मचारी नेते आॅल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे महासचिव शिवगोपाल मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले की चर्चा सकारात्मक दिशेने सुरू आहे मात्र बंद खोलीतील वाटाघाटींबाबत सरकारवर किती विश्वास ठेवावा, असा आमच्यापुढे प्रश्न आहे. एक तर सरकारने लेखी स्वरूपात कर्मचाऱ्यांना आश्वासन द्यावे, अन्यथा आपली भूमिका स्पष्ट करणारी अधिसूचना सार्वजनिकरित्या जारी करावी, असे आमचे म्हणणे आहे. वेतनवाढीच्या निर्णयाच्या विरोधात केंद्रीय कर्मचाऱ्यांनी ११ जुलैपासून संप जाहीर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि गृहमंत्री राजनाथसिंग यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाला चर्चेसाठी बोलावले. चर्चेच्या पहिल्या फेरीत कर्मचाऱ्यांनी मुख्यत्वे दोन प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या. पहिली मागणी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन ७ हजारांवरून थेट २६ हजार रुपयांपर्यंत वाढवावी, अशी असून, दुसरी मागणी नव्या पेन्शन व्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या तिढ्याची चिंता सरकारने विनाविलंब दूर करावी, ही आहे. प्राथमिक चर्चेनंतर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन वाढवण्याच्या मागणीचा विचार एका विशेष समितीकडे सोपवण्याचा प्रस्ताव सरकारने या प्रतिनिधींसमोर ठेवला. समितीच्या निर्णयासाठी कालबद्ध मुदत निश्चित करण्याचे आश्वासनही दिले. ...तर माघार घेतली जाईल- केंद्र सरकारच्या तोंडी आश्वासनावर मात्र कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाचा विश्वास नाही. सरकारने आम्हाला लेखी आश्वासन द्यावे अथवा अधिकृत अधिसूचना जारी करावी, तरच संप मागे घेण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे कर्मचारी नेत्यांचे म्हणणे आहे. - सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाला सरकारने सोमवारी आश्वासन दिले की किमान वेतनवाढ आणि नव्या व्यवस्थेत कर्मचाऱ्यांना पेन्शनविषयी वाटणाऱ्या चिंतांचा सर्वंकष विचार करण्यासाठी लवकरच एक समिती नियुक्त केली जाणार आहे. - आता दोन्ही पक्ष पुढचे पाउल काय उचलतात? यानंतर उभय पक्षात मुळात चर्चा होईल काय? वाटाघाटीतून प्रश्न खरोखर सुटेल काय? की कर्मचारी हरताळाचे शस्त्र उपसतील? असे प्रश्न निर्माण झाले असून सर्वांचे त्याकडे लक्ष वेधले गेले आहे.