शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

प्रिन्स अली खान रुग्णालयात कर्मचार्‍यांचा गोंधळ

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

मुंबई : माझगाव येथील प्रिन्स अली खान रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत काम बंद आंदोलन केले. शुक्रवारी सायंकाळी रुग्णालय प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत कर्मचार्‍यांच्या मागण्यांचा विचार न केल्यामुळे प्रिन्स अली खान कामगार संघटनेच्या नेतृत्त्वाखाली शनिवारी कामबंद आंदोलन करण्यात आले.कर्मचार्‍यांना कायमस्वरुपी करावे, निवृत्तीसाठी ५८ ही वयोमर्यादा करण्यात ...


मुंबई : माझगाव येथील प्रिन्स अली खान रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत काम बंद आंदोलन केले. शुक्रवारी सायंकाळी रुग्णालय प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत कर्मचार्‍यांच्या मागण्यांचा विचार न केल्यामुळे प्रिन्स अली खान कामगार संघटनेच्या नेतृत्त्वाखाली शनिवारी कामबंद आंदोलन करण्यात आले.
कर्मचार्‍यांना कायमस्वरुपी करावे, निवृत्तीसाठी ५८ ही वयोमर्यादा करण्यात यावी, सर्व कर्मचार्‍यांना वेतनवाढ मिळावी, कर्मचार्‍यांना सेवेत बढती मिळावी आणि अशा इतर मागण्यांसाठी रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, रुग्णसेवा ठप्प झाल्याने रुग्णांचेही हाल झाले.
रुग्णालयात कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाला शुक्रवारी रात्री उशिरा कळल्याने प्रशासनातील अधिकार्‍यांनी रुग्णांना लवकरात लवकर डिस्चार्ज घेण्याचा सल्ला दिला. मात्र रुग्णांच्या हतबल नातेवाईकांनी रात्री-अपरात्री रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात कसे हलविणार याबाबत शंका उपस्थित केली. शिवाय, रुग्णाची तब्येत बिघडल्यास जबाबदारी कोण घेणार, अशी विचारणाही प्रशासनाला केली. त्यावर कामगार संघटनेने आपल्यामुळे रुग्णांचे हाल होऊ नये, याकरिता आंदोलन मागे घेत रुग्णालय प्रशासनाला अजून दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे सोमवारी पुन्हा प्रशासन आणि कामगार संघटनेची बैठक होणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल असे प्रिन्स अली खान कामगार संघटनेचे सरचिटणीस किरण लोंढे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
............................