शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत खड्डयांचे साम्राज्य; पॅचवर्कचे काम निकृष्ट दर्जाचे पावसाळ्याआधी खड्डे बुजविण्याची मागणी

By admin | Updated: May 12, 2014 21:09 IST

(फोटो)

(फोटो)
इचलकरंजी : शहरातील प्रमुख मार्गांवरील रस्त्यांच्या पॅचवर्कचे काम या वर्षभरात दोनवेळा करण्यात आले. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पुन्हा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. त्याचबरोबर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दररोज किरकोळ अपघात होत आहेत.
या वर्षभरामध्ये नगरपालिकेने दोनवेळा मुख्य मार्गावर पॅचवर्क केले. पहिल्यांदा झालेले पॅचवर्कचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने अवघ्या दोन महिन्यांतच निघून रस्त्यावर खडी पसरली. त्यावरून घसरून पडून दोघांचा मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेवर मोर्चे काढण्यात आले. नागरिकांनी नगरपालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. त्यानंतर काही दिवसांनी तरतूद करून पालिकेने दुसर्‍यांदा पॅचवर्कचे काम केले. सहा महिने उलटल्यानंतर सद्य:स्थितीला पुन्हा पॅचवर्क केलेल्या जागेवर, तर काही ठिकाणी त्याच्या बाजूला नवीन खड्डे तयार झाल्याचे दिसत आहे.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या महिन्यातच हे खड्डे बुजवणे गरजेचे आहे; अन्यथा पावसाळ्यात पाणी साचून रस्ते खराब होण्याबरोबरच मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. शहरातील शाहू पुतळा, डेक्कन रोड, कापड मार्केट, थोरात चौक, आर.पी. रोड, महेश सेवा समिती, विकली मार्केट, झेंडा चौक, गावभाग, लिंबू चौक यासह अनेक प्रमुख चौक व रस्ते यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पॅचवर्कनंतर काही ठिकाणी रिलायन्स केबल खुदाईमुळे पुन्हा रस्ते खराब झाले आहेत. नगरपालिकेने खुदाईने झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटीची रक्कम संबंधित कंपनीकडून भरून घेतली असली, तरी त्याचेही काम करण्यात आले नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यांच्या बाजूला चर तशीच राहिली आहे. पावसाळ्यात त्याठिकाणी वाहने अडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवून घ्यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)
चौकट
तीन बत्ती ते कलानगर रस्ता पॅचवर्कचे काम अर्धवट
तीन बत्ती ते कलानगर-चंदूर ओढा या मार्गावरील दोनवेळा केलेले निकृष्ट दर्जाचे पॅचवर्क निघून गेले. आता तिसर्‍यांदा या मार्गावरील पॅचवर्कचे काम झाले आहे. मात्र, ते अर्धवट स्वरूपाचे करण्यात आले आहे. काही ठिकाणी खड्डे तसेच सोडण्यात आले आहेत, तर अर्धा रस्ता हॉटमिक्स, तर अर्धा रस्ता मोकळाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हॉटमिक्स झालेल्या रस्त्यावरून जाण्याच्या नादात वाहनधारकांत छोटे-मोठे अपघात व वादावादी होताना दिसत आहे. पालिकेत संबंधित मक्तेदाराला रस्त्याचे काम पूर्ण केल्यानंतरच त्याची बिले काढावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
(फोटो ओळी)
१२०५२०१४-आयसीएच-०२
इचलकरंजीतील थोरात चौकामधील रस्त्यावर असे खड्डे पडले आहेत.

१२०५२०१४-आयसीएच-०३
महेश सेवा समिती समोर सुरू असलेले निकृष्ट दर्जाच्या पॅचवर्कचे काम.

१२०५२०१४-आयसीएच-०४
तीन बत्ती ते कलानगर रस्त्यावर अर्ध्या भागात हॉटमिक्स, तर अर्ध्या भागात खड्डे तसेच सोडल्याचे छायाचित्र.
(सर्व छाया-उत्तम पाटील)