शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

तणावात भावनिक क्षण घेऊन आली 'समझोता एक्स्प्रेस'

By admin | Updated: September 28, 2016 10:18 IST

उरीमधल्या दहशतवाही हल्ल्यानंतर समझोता एक्स्प्रेस मंगळवारी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचली, त्यावेळी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला तणाव प्रवाशांचा चेह-यावर दिसत नव्हता.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 28 - उरीमधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर समझोता एक्स्प्रेस मंगळवारी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचली, त्यावेळी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला तणाव प्रवाशांचा चेह-यावर दिसत नव्हता. आठवड्यातून दोन दिवस लाहोरहून निघणारी ही एक्स्प्रेस पंजाबहून दिल्ली टर्मिनसला येते. मंगळवारी आलेल्या एक्स्प्रेसमध्ये एकूण 184 प्रवासी होते. यातले 84 प्रवासी हे पाकिस्तानी तर उरलेले सर्व भारतीय होते. गेल्या आठवड्यात उरीमधल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर यावेळी प्रवाशांची संख्या कमी झाली आहे.  मात्र, दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाचा समझोता एक्स्प्रेसनं प्रवास करणा-यांवर काहीही परिणाम झालेला दिसला नाही. 
 
मेरठमधले रहिवासी मोहम्मद नौशाद कराचीहून येणारा चुलत भाऊ शहजाद कुरेशीला भेटण्यासाठी प्रचंड आतूर होते. 'दोन्ही देशांमधली परिस्थिती तणावपूर्ण आहे. मात्र, टीव्हीच्या माध्यमातून खरे कमी आणि अफवा जास्त पसरवल्या जातात', असं नौशाद यांनी यावेळी  सांगितले.  याचवेळी एक भावनिक क्षणदेखील पाहायला मिळाला. 50 वर्षांचे शहजाद जेव्हा एक्स्प्रेसमधून उतरले, त्यावेळी त्यांनी आपल्या चुलत भावाला मिठी मारली. या दोघांच्या आयुष्यातील ही पहिली भेट. तब्बल 36 वर्षांनंतर पाकिस्तानमधून भारतात आलेले शहजाद याआधी आपल्या भावाला भेटले नव्हते. यापूर्वी मी इथे कधी आलो होतो, हे देखील मला आठवत नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी शहजाद यांनी दिली. 
 
एक्स्प्रेस येताच प्लेटफॉर्म पूर्णतः सामानांनी व्यापून गेले. पाकिस्तानातून आलेल्या लोकांनी आपल्या नातेवाईकांसाठी भरभरुन भेटवस्तूही आणल्या. दरियागंजमध्ये राहणारे मोहम्मद अकील आपल्या भावाला भेटण्यासाठी कराचीला गेले होते. इथून मायदेशी परतताना त्यांनी ब-याच भेटवस्तू भारतात राहणा-या नातेवाईक आणि मित्रमंडळींसाठी आणल्या. उरी दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधली परिस्थिती अस्थिर झालेली असतानाही अकील आपला व्हिसा 30 दिवसांपर्यंत वाढवण्यात यशस्वी ठरले. सामान्यांना युद्ध वगैरे काही नकोय, आमच्यासाठी पाकिस्तान घराप्रमाणे आहे, कारण आमचे नातेवाईक त्याठिकाणी राहत आहेत, असेही यावेळी अकील यांनी म्हटले. 
 
काही तास प्लेटफॉर्मवर असेच भावनिक वातावरण होते, कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अनेक जण आपल्या नातेवाईकांची भेट घेत होते. काही क्षण हृदयात, डोळ्यामध्ये साठवत होते. 1976 पासून समझोता एक्स्प्रेसची सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर 2001 मध्ये संसदेवरचा दहशतवादी हल्ला आणि 2007 मध्ये पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर ही एक्स्प्रेस थांबवण्यात आली होती.  या दोन घटना वगळता दोन देशांमधल्या सीमेमुळे दुरावलेल्या लोकांना जवळ आणण्याचं काम गेल्या 40 वर्षांपासून ही एक्स्प्रेस आजपर्यंत करत आली आहे.