शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकारी अभियंत्यावर खुर्ची जप्तीची नामुष्की

By admin | Updated: April 27, 2016 00:09 IST

सीईओंनी झटकले अंग : पाझरतलाव, साठवण बंधारा भूसंपादन प्रकरण

सीईओंनी झटकले अंग : पाझरतलाव, साठवण बंधारा भूसंपादन प्रकरणनाशिक : मालेगावच्या भूसंपादन प्रकरणात काही दिवसांपूर्वीच नाशिकचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यावर खुर्ची जप्तीची वेळ आलेली असतानाच, मंगळवारी (दि. २६) जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यावर मालेगाव व दिंडोरी येथील शेतकर्‍यांच्या भूसंपादनाचा वाढीव मोबदला देण्याच्या कारणावरून न्यायालयाच्या आदेशानुसार खुर्चीसह संगणक, टेबल जप्तीची वेळ आली.मंगळवारी दुपारीच हातनोरे (दिंडोरी) येथील पाझरतलावासाठी माधव कुशबा बोरस्ते यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात आले होते. त्यासाठी संबंधित शेतकरी माधव बोरस्ते यांनी २७ लाख ६ हजारांचा वाढीव मोबदला २००१ साली मागितला होता. त्याप्रकरणी संबंधित शेतकर्‍याने जिल्हा सत्र न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केली होती. २०१० साली शेतकर्‍याच्या बाजूने निकाल लागून शेतकर्‍याला वाढीव मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा परिषदेला दिले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने यासंदर्भात जानेवारी २०१६ मध्ये ग्रामविकास विभागाच्या प्रधानसचिवांना वाढीव मोबदला देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतरही जिल्हा परिषदेने या शेतकर्‍याला भूसंपादनाचा वाढीव मोबदला न दिल्याने न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांची खुर्ची, संबंधित लिपिक शेवाळे यांची खुर्ची व संगणक तसेच चार टेबल या शेतकर्‍याने जमा करून न्यायालयात जमा केले. अशाच वाढीव मोबदल्याच्या प्रकरणात मालेगाव तालुक्यातील डोंगरेज येथील शेतकरी त्र्यंबक रामचंद्र खैरनार यांनी १४ लाखांच्या वाढीव मोबदल्यासाठी खुर्ची जप्तीसाठी धाव घेतली. मात्र त्यांना तूर्तास थांबण्यास सांगण्यात आल्याचे कळते. खुर्ची जप्तीच्या कारवाईने दिवसभर जिल्हा परिषदेत याच प्रकरणाची चर्चा होती. (प्रतिनिधी)इन्फो..अंग झटकलेखुर्ची जप्तीची कारवाई सुरू असतानाच कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना या कारवाईची कल्पना दिली. मात्र शंभरकर यांनी याप्रकरणी संबंधित विभागास दिलासा देण्याऐवजी असेच प्रकरण इगतपुरीत कावनई येथे असून, त्याप्रकरणी नियोजन करू, असे सांगत वेळ मारून नेल्याचे समजते. वास्तविक पाहता या प्रकरणात मिलिंद शंभरकर यांनी शिष्टाई करून ही खुर्ची जप्तीची बदनामी टाळणे शक्य असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होती.फोटो कॅप्शन-२६ पीएचअेपी- ७६ कार्यकारी अभियंत्याची खुर्ची, संगणक जप्त करताना शेतकरी. २६ पीएचअेपी-७७ कार्यकारी अभियंत्याची खुर्ची जप्त करताना संबंधित शेतकरी. (छाया : नीलेश तांबे)