शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी अधिकारी व डीबीच्या कर्मचार्‍यांचे कान उपटले तातडीची बैठक : घरफोडी रोखण्याच्या बैठकीतच आली घरफोडीची बातमी

By admin | Updated: October 5, 2016 00:31 IST

जळगाव: गेल्या दोन दिवसापासून एका पाठोपाठ घरफोड्या होत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी मंगळवारी शहरातील सर्व प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्‍यांची तातडीची बैठक घेवून त्यांचे कान उपटले. दरम्यान, घरफोड्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली जात असतानाच अक्सा नगरात दहा लाख रुपयांची धाडसी घरफोडी झाल्याची बातमी येऊन धडकली. त्यामुळे बैठक चांगलीच गरमागरम झाली.

जळगाव: गेल्या दोन दिवसापासून एका पाठोपाठ घरफोड्या होत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी मंगळवारी शहरातील सर्व प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्‍यांची तातडीची बैठक घेवून त्यांचे कान उपटले. दरम्यान, घरफोड्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली जात असतानाच अक्सा नगरात दहा लाख रुपयांची धाडसी घरफोडी झाल्याची बातमी येऊन धडकली. त्यामुळे बैठक चांगलीच गरमागरम झाली.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात झालेल्या या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व उपअधीक्षक सचिन सांगळे उपस्थित होते. शहरात सुरू असलेल्या घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी गुन्हे शोध पथकाला अपयश येत आहे. या पथकातील कर्मचारी निष्क्रीय झाल्यानेच या घटनांमध्ये वाढ होत आहे. बोटावर मोजण्या इतक्याच कर्मचार्‍यांची कामगिरी समाधान आहे. त्यामुळे निष्क्रीय ठरलेल्या कर्मचार्‍यांवर बदलीची कुर्‍हाड कोसळू शकते, असा इशारा सुपेकर यांनी बैठकीत दिला.
चांगले काम करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांना ज्या पध्दतीने रिवॉर्ड दिला जातो, त्याच पध्दतीने निष्क्रीय काम करणार्‍यांची नोंद सेवा पुस्तकात घेतली जाणार आहे. घरफोडी व चोरीच्या घटना रोखण्यासाठी आपआपल्या हद्दीत प्रामाणिकपणे गस्त घातली तरी या गुन्‘ांना आळा बसेल, परंतु कर्मचार्‍यांची गस्त कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे. अचानक नाकाबंदी, कोम्बींग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्याच्या सूचना सुपेकर यांनी दिल्या. गस्ती व अन्य कामात पोलीस मित्रांची मदत घ्यावी असेही त्यांनी सुचविले. दरम्यान, या बैठकीनंतर उपअधीक्षक सचिन सांगळे यांनीही प्रभारी अधिकार्‍यांची बैठक घेतली.