शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या ‘ब्रिक्स’ भेटीमुळे दुभाषींचा प्रश्न ऐरणीवर!

By admin | Updated: July 15, 2014 02:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंग्रजीहून हिंदी भाषेवर अधिक प्रभुत्व असल्याने परकीय पाहुण्यांसोबत होणाऱ्या राजनैतिक वाटाघाटींच्यावेळी हिंदीत बोलणे ते पसंत करीत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंग्रजीहून हिंदी भाषेवर अधिक प्रभुत्व असल्याने परकीय पाहुण्यांसोबत होणाऱ्या राजनैतिक वाटाघाटींच्यावेळी हिंदीत बोलणे ते पसंत करीत असल्याने प्रमुख परकीय भाषांचे थेट हिंदीत व हिंदीचे त्या परकीय भाषेत भाषांतर करणारे तज्ज्ञ दुभाषी परराष्ट्र मंत्रालयात उपलब्ध नसल्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.ब्राझीलच्या फोर्टेलिझा शहरात होणाऱ्या ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या (ब्रिक्स) परिषदेसाठी पंतप्रधान मोदी सध्या गेलेले असताना हा प्रश्न अधिक प्रकषाने पुढे आला आहे. एरवीचे संभाषण व राजनैतिक चर्चा यात खूप फरक असतो. यात उभय नेत्यांच्या वक्तव्यातील प्रत्येक शब्दाची अचूक अर्थछटा व संदर्भ परस्परांना समजणे अत्यंत महत्वाचे असते. अन्यथा मोठी गडबड व अडचण होऊ शकेत. त्यामुळे जागतिक पातळीवर असे पाहायला मिळते की, बहुतांश नेत्यांना इंग्रजी समजत असले व बोलता येत असले तरी ते आपले म्हणणे अधिक चपखलपणे मांडण्यासाठी आपापल्या भाषेला पसंती देतात.‘ब्रिक्स’पुरतेच बोलायचे तर या शिखर परिषदेला येणाऱ्या मोदींखेरीज इतर नेत्यांपैकी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा हे एकटेच अशा बैठकींच्या वेळी इंग्रजीत बोलतात. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष डिल्मा रोसेफ पोतुर्गीजमध्ये बोलतात. रशियाचे पंतप्रधान ब्लादिमीर पुतीन यांना इंग्रजी येत असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजनैतिक वाटाघाटींच्या वेळी ते रशियन भाषेला प्राध्यान्य देतात. राष्ट्राभिमानाचा एक भाग म्हणून फक्त मंडारिन भाषेत (चीनची प्रमुख भाषा) बोलण्याची चीनी नेत्यांची परंपरा असल्याने चीनचे राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग हेही त्याच भाषेत बोलणार हे उघड आहे.परराष्ट्र मंत्रालयाची अडचण अशी आहे की, फ्रेंच. जर्मन, रशियन, मंडारिन, जपानी अशा प्रमुख परकीय भाषांचे इंग्रजीत अस्खलीत व अचूक भाषांतर करणारे दुभाषे उपलब्ध नाहीत. गेली १० वर्षे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग किंवा वेळोवेळी परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहिलेले के. नटवर सिंह, प्रणब मुखर्जी, एल. एम. कृष्ण किंवा सलमान खुर्शिद हे सर्व अशा वेळी इंद्रजीतच संभाषण करीत असल्याने फारशी अडचण भासली नव्हती. पण आता पोतुर्गीज. रशियन, मंडारिन अशा परकीय भाषांमधील संभाषण अचूकपणे मोदींना हिंदीतून भाषांतर करून सांगणारे किंवा मोदींच्या हिंदी संभाषणाचे थेट संबंधित परकीय भाषेत तंतोतंत रुपांतरण करणारे प्रशिक्षित दुभाषे मंत्रालयाकडे उपलब्ध नाहीत.यावर तात्पुरता उपाय म्हणून परराष्ट्र मंत्रालयाने ज्यांना अस्खलीत हिंदी येते अशा परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांचा संयुक्त सचिव (दहशतवादविरोधी) विनय मोहन क्वात्रा यांच्या नेतृत्वाखाली एक ‘पूल’ तयार केला आहे. हे अधिकारी प्रमुख परकीय भाषांचे थेट हिंदीत नाही तरी इंग्रजीच्या माध्यमातून हिंदीत रुपांतरण करू शकतात. याच अधिकाऱ्यांचा चमू आता मोदींसोबत ब्राझीलला गेला आहे.भारत भेटीवर येणाऱ्या परदेशी पाहुण्याच्या मोदींसोबत होणाऱ्या भेटीच्या वेळीही अशीच व्यवस्था केली जाते. अलीकडेच ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री विल्यम हेग व अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री बिल्यम बर्नस् मोंदींना भेटले तेव्हाही इंग्रजी-हिंदी दुभाषांची गरज भासली. या दोन्ही पाहुण्यांशी स्वत: मोदी इंग्रजी व हिंदी या दोन्ही बाषांमधून बोलले. पण इंग्रजी बोलण्याची ढब देशागणिक वेगळी असल्याने व एखाद्या शब्दाच्या अर्थाचा नेमका कंगोरा समजावून देण्यासाठी दुभाषींचा वापर करावा लागला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)