नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणाची चौकशी करीत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी येथे राजकीय नेते अमरसिंग यांचा दोन तास जाबजबाब नोंदविला. सुनंदा त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी आपल्याकडे आयपीएल वादाबद्दल बोलल्या होत्या, असा दावा अमरसिंग यांनी नुकताच केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनंदा यांनी आयपीएल वादाबद्दल नेमकी काय माहिती दिली होती, याबाबत सिंग यांना विचारणा करण्यात आली.