वीज पडून इसम ठार
By admin | Updated: May 5, 2014 20:27 IST
नाशिक : बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे येथे सोमवारी दुपारी वादळी वार्यासह कडाडलेली वीज पडून एक इसम जागीच ठार झाला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून बागलाण तालुक्यात अधूनमधून ढगांची गर्दी होऊन अवकाळी पावसाबरोबरच वादळी वारे वाहू लागले आहेत. त्यातूनच आजची घटना घडली. बापू अभिमन पगारे (६०) असे या शेतकर्याचे नाव असून, शेतात काम करीत असताना दुपारी दोन वाजता त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेचे वृत्त पोलीस व महसूल विभागाला कळविण्यात आले आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, शासकीय आदेशान्वये येत्या दोन दिवसांत त्यांच्या कुटुंबीयांना दीड लाखाची मदत दिली जाईल.