शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलपाठोपाठ ग्राहकांना आता बसणार वीज दरवाढीचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:27 IST

कोळशाची कमतरता; ट्रान्समिशन लाइनही पडली बंद

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने देश होरपळून निघाला असताना आता विजेच्या दरवाढीचा आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी जास्त असताना, औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाचा पुरेसा पुरवठा नाही. पश्चिम भारतातून उत्तरेकडील राज्यांना वीज पुरवणारी महत्त्वाची ट्रान्समिशन लाइन नेमकी या काळात तुटल्यामुळे वीजपुरवठ्याचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे वीज दरात अनपेक्षित वाढ अपेक्षित आहे.इंडियन एनर्जी एक्सचेंजमध्ये विजेची किंमत २ वर्षांतील सर्वाधिक म्हणजे ६ रुपये २0 पैसे प्रति युनिट नोंदली गेली. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थानमध्ये सोमवारी विजेचा दर ८ रुपयांवर पोहोचला, जो आधी ७ रुपये ४३ पैसे युनिट होता. एक्सचेंजमध्ये एका आठवड्यात वीजदरात युनिटमागे २ रुपये वाढ झाली.गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश व तामिळनाडूत वीज टंचाई दूर करण्यासाठी वीज वितरण कंपन्या थेट स्पॉट मार्केटमधून वीज खरेदी करतात. या कंपन्यांना महाग दराने वीज मिळाल्यास तो बोजा त्या ग्राहकांवर टाकतात. औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना वेळेवर पुरेसा कोळसा पुरवठ्यावरील देखरेखीचे काम केंद्रीय विद्युत प्राधिकरणाकडे आहे.आजमितीला देशातील ११४ पैकी २२ औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांत कोळशाचा साठा चिंताजनक आहे. १६ थर्मल प्लँटमधे अवघा ४ दिवस पुरेल इतका तर ६ थर्मल प्लँटमधे ७ दिवसांपुरता कोळसा शिल्लक आहे. कोळसा टंचाईला सामोऱ्या जाणाºया वीजनिर्मिती केंद्रांपैकी ९ उत्तर भारतात तर १३ पश्चिम भारतात आहेत.संकटात भरपश्चिम भारताकडून उत्तर भारताला वीजपुरवठा करणारी ट्रान्समिशन लाइन नेमकी याच काळात तुटली. अगोदरच संकटात असलेल्या वीजपुरवठ्यात त्यामुळे अधिकच भर पडली. त्यामुळे यंदाच्या पेट्रोल, डिझेलबरोबर वीज दरवाढीचा झटकाही ग्राहकांना सोसावाच लागेल.सध्या १६ थर्मल प्लँटमध्ये अवघा ४ दिवस पुरेल इतका तर ६ थर्मल प्लँटमधे ७ दिवसांपुरता कोळसा शिल्लक आहे.

टॅग्स :electricityवीजPetrolपेट्रोल