शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

२०१८ पर्यंत प्रत्येक गावात वीज-गोयल

By admin | Updated: March 7, 2016 03:02 IST

२०१८ पर्यंत देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचविण्याचे सरकारचे लक्ष्य आहे; परंतु त्यापूर्वीच हे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने काम सुरू झालेले आहे

मथुरा : २०१८ पर्यंत देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचविण्याचे सरकारचे लक्ष्य आहे; परंतु त्यापूर्वीच हे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने काम सुरू झालेले आहे, अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी दिली. देशात वीज वा कोळशाची टंचाई नाही, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.‘देशात वीज आणि कोळशाची अजिबात टंचाई नाही. त्यामुळे कोणताही वीज प्रकल्प तात्पुरता बंद केला जाणार नाही. सध्या आम्ही कोणत्याही राज्याला मागणीनुसार वीजपुरवठा करू शकतो,’ असे गोयल म्हणाले. शनिवारी सायंकाळी मथुरा येथे भाजयुमोच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत गोयल बोलत होते.२०१८ पर्यंत देशातील सर्व गावांचे विद्युतीकरण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिज्ञेचा उल्लेख करून गोयल म्हणाले, सर्व गावांत वीज पोहोचविण्याचे हे लक्ष्य २०१७ मध्येच गाठण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आतापर्यंत ६,११४ गावांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजे आमचे ३८ टक्के काम पूर्ण झाले आहे.गोयल यांनी एलईडी दिव्यांचा वापर वाढविण्याचे समर्थन केले. एलईडी बल्ब बाजारात ४५० रुपयाला मिळतो; पण आम्ही सामान्य माणसाला तो ७५ रुपयांत विकत आहोत. देशातील प्रत्येक घरात २०१९ पर्यंत एलईडी बल्ब लागावा, हे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी ७७ कोटी बल्बची विक्री केली जाईल. त्यामुळे २.५ कोटी युनिट ऊर्जेची बचतही होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी यांचीही भाषणे झाली. (वृत्तसंस्था)