शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

यूपीमध्ये जानेवारीत होणार निवडणूक

By admin | Updated: June 18, 2016 01:33 IST

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांची अधिसूचना काढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली असून, पुढील वर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातपर्यंत पाच टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा निवडणूक

- मीना दुबे,  लखनौ

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांची अधिसूचना काढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली असून, पुढील वर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातपर्यंत पाच टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न असल्याचे समजते. निवडणुकीची अधिसूचना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात निघेल, असे कळते.सर्वच राजकीय पक्ष निवडणुकाच्या तयारीला लागले असून, विविध मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडू लागल्या आहेत. सध्याच्या विधानसभेची मुदत १५ मार्च २0१७ रोजी संपत आहे. अर्थात विधानसभेची पहिली बैठक ८ मे रोजी झाली होती, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले. तरीही १५ मार्चच्या आधी निवडणूक प्रक्रिया संपवणे आयोगाला आवश्यक आहे. आम्ही निवडणुकांच्या कार्यक्रमाची ब्लू प्रिंट केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवली आहे, असे राज्य निर्वाचन अधिकाऱ्यांनी सांगितले.अधिसूचना १५ ते २0 जानेवारीच्या दरम्यान निघून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नामांकन अर्ज भरण्यास सुरुवात व्हावी आणि १८ फेब्रुवारी ते १0 मार्चच्या दरम्यान पाच टप्प्यांमध्ये मतदान पूर्ण करून निकाल लावावेत, असा आयोगाचा प्रयत्न राहील. मतदारयाद्यांचे काम यावर्षी आॅक्टोबरपर्यंत पूर्ण केले जाईल. हे काम वेळेत पूर्ण करण्यास सर्व जिल्ह्यांना सांगण्यात आले आहे. जूनच्या शेवटच्या वा जुलैच्या पहिल्या आठवड्यात आयोगातर्फे सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावण्यात येईल आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेईल. राजकीय पक्षांनाही या कार्यक्रमाची कल्पना असून, त्यामुळे राज्यात प्रचाराची राळ उडायला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी व काँग्रेसचे नेते जोरात कामाला लागले असून, त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हिंदू व मुस्लीम यांच्यात तणाव निर्माण करण्याचे प्रयत्नही सुरू झाले असून, त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी खूपच वाढत चालली आहे. सत्ताधारी समाजवादी पक्षाने विविध योजना जाहीर करणे, योजना व प्रकल्प यांची पायाभरणी,उद्घाटन यांना जोर चढला आहे. लखनौ एक्स्प्रेस, कॅन्सर रुग्णालय व लखनौ मेट्रोचे लोकार्पण आॅक्टोबर व जानेवारीमध्ये केले जाण्याची चिन्हे आहेत. सचिवालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे.