शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

निवडणुकांचा विचार केला नाही

By admin | Updated: February 2, 2017 04:25 IST

नोटाबंदीच्या निर्णयामुळे जे भरडून निघाले त्या सगळ््यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने केलेला प्रयत्न म्हणजे बुधवारी सादर झालेला केंद्रीय सर्वसाधारण अर्थसंकल्प.

- हरिश गुप्ता,  नवी दिल्ली

नोटाबंदीच्या निर्णयामुळे जे भरडून निघाले त्या सगळ््यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने केलेला प्रयत्न म्हणजे बुधवारी सादर झालेला केंद्रीय सर्वसाधारण अर्थसंकल्प. निम्न आणि मध्यम वर्गाला दर वर्षाला १२,५०० रुपयांची कर सवलत दिली तर कंपन्यांना करात ५ टक्के अनपेक्षित सवलत दिली. तथापि, हा लाभ ज्या उद्योगांची वार्षिक उलाढाल ५० कोटी रुपयांची आहे, त्यांच्यापुरतीच मर्यादित ठेवण्यात आला आहे. भाषणात अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटांबदीच्या निर्णयाचे समर्थन केले. नोटाबंदीच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम (आघात) हा पुढील वर्षी असणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. पण आश्चर्याची बाब म्हणजे जमा झालेल्या जुन्या नोटांबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काहीही खुलासा केला नाही. जुन्या नोटा जमा करण्याची मुदत ३० डिसेंबर रोजी संपली. पण बँकांत किती पैसा जमा झाला आहे हे अद्याप जाहीरच करण्यात आलेले नाही. नोटाबंदीमुळे ज्यांच्या डोळ््यांत अश्रू आले त्यांचे डोळे पुसण्याचा प्रयत्न जेटली यांनी केला आहे. जेटली यांच्यासमोर आर्थिक तूट कमी करण्याचे मोठे अवघड आव्हान होते. ते काही फार सवलती देऊ शकलेले नाहीत. वैयक्तिक आणि लघुउद्योगांच्या आयकरात कपात करून जेटली यांनी त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. नोटाबंदीमुळे लघुउद्योगांना तोटा सोसावा लागला व त्यातील मोठ्या संख्येने उद्योग बंदही झाले. निवडणुका होत असलेल्या उत्तर प्रदेशसह सर्वच लघुउद्योगांनाही या निर्णयाचा लाभ होईल. पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्या तरी अर्थसंकल्पात त्या नजरेसमोर ठेवण्यात आलेल्या नाहीत, एवढेच याचे वैशिष्ट्य.सगळ््या गृहनिर्माण योजनांसाठी प्रचंड म्हणता येईल असा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे स्थावर मालमत्तेच्या (रियल इस्टेट) क्षेत्राला मोठे प्रोत्साहन मिळेल कारण नोटाबंदीच्या निर्णयाचा या क्षेत्राला मोठा फटका बसला होता.