शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Election Results Live - उत्तराखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत

By admin | Updated: March 11, 2017 10:27 IST

उत्तराखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून सत्तेत आली आहे. भाजपाने 51 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे.

ऑनलाइन लोकमत
देहरादून, दि. 11 - उत्तराखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून सत्तेत आली आहे. भाजपाने 51 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे. 70 विधानसभा जागांपैकी भाजपाने 51, काँग्रेसने 16 जागांवर विजय मिळवला आहे. 70 सदस्यांच्या उत्तराखंड विधानसेत 15 फेब्रुवारी रोजी 69 जागांसाठी मतदान झालं होतं. एकूण 65.64 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. ऊधम सिंह नगरमध्ये सर्वात जास्त 75.79 टक्के मतदान झाल होतं, तर अल्मोडा येथे सर्वात कमी 52.81 टक्के मतदान झालं होतं. 
 
 त्तराखंडमध्ये दणदणीत बहुमतासह भाजपाचे सत्तेत पुनरागमन होईल असा अंदाज न्यूज-24 आणि टुडेज चाणक्यने वर्तवला होता. मात्र इंडिया टीव्ही आणि सीसेरोने आपल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी 29 ते 35 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केल्याने उत्तराखंडमधील निकालांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. 
 
उत्तराखंडचे वर्तमान मुख्यमंत्री हरिश रावत यांनी सत्ता कायम राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. पण भाजपानेही सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली होती. दरम्यान, न्यूज 24 आणि टुडेज चाणक्यचा एक्झिट पोल भाजपासाठी आनंदाची बातमी घेऊन आला होता. 70 सदस्य असलेल्या उत्तराखंडच्या विधानसभेत भाजपाला 53 जागांसह निर्विवाद बहुमत मिळेल असा दावा या एक्झिट पोलमधून करण्यात आला होता. न्यूज-24 आणि टुडेज चाणक्यने या पोलमध्ये काँग्रेसला 15 आणि इतरांना केवळ दोन जागा दिल्या होत्या.
 
तर इंडिया टुडे आणि सीसेरोने आपल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये कांटे की लढत झाल्याचे सांगितले होते. या एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी 29 ते 35 जागा मिळण्याची शक्यता होती. सी व्होटरनेही उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी 32 जागा मिळतील, असे भाकीत आपल्या एक्झिट पोलमधून केले होते.
 
उत्तराखंडमध्ये 2012 च्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर काँग्रेसने इतर पक्षांच्या साथीने सरकार स्थापन केले होते. त्या निवडणुकीत काँग्रेसने 32 तर भाजपाने 31 जागा जिंकल्या होत्या. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाच्या खात्यात 3 जागा गेल्या होत्या. अन्य पक्षांनी 4 जागांवर विजय मिळवला होता.