शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Election Result Live - इरोम शर्मिला यांचा पराभव

By admin | Updated: March 11, 2017 10:49 IST

मणिपूरमधील मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांचा पराभव झाला आहे. मुख्यमंत्री ओकाराम इबोबीसिंग यांनी शर्मिला यांचा पराभव केला आहे.

ऑनलाइन लोकमत

इंफाळ, दि. 11 - देशातल्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींचा निकाल हाती येत आहेत. मुख्यमंत्री ओकाराम इबोबीसिंग यांनी मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. मणिपूरच्या जनतेने थौबल येथून ओकाराम इबोबीसिंग यांना साथ दिली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून मणिपूरमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.
 
 
दरम्यान, मणिपूरमध्ये भाजपाचे कमळ फुलेल असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी वर्तवला होता. पण एक्झिट पोलचा अंदाज चुकल्याचे दिसत आहे. या राज्यात काँग्रेसची सत्ता कायम राहिल असा अंदाज आहे.  मणिपूरमध्ये गेल्या 15 वर्षांपासून ओकाराम इबोबी सिंग यांची सत्ता आहे. टाइम्स नाऊ व्हीएमआरच्या एक्झिट पोलने मणिपूरमध्ये भाजपाला 25 ते 31, काँग्रेसला 17 ते 23 आणि इतर पक्ष व अपक्षांना 9 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होतातर सी-व्होटरनेही मणिपूरमध्ये भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवली आहे. 
सी-व्होटरच्या अंदाजानुसार मणिपूरमध्ये भाजपा 28 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरेल. तर काँग्रेसला केवळ 20 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर अन्य पक्षांना 12 पर्यंत जागा मिळू शकतात.  2012 साली झालेल्या मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला 42 जागांवर विजय मिळाला होता. तर तृणमूल काँग्रेसने 7 जागा जिंकल्या होत्या तर इतरांच्या खात्यात 11 जागा गेल्या होत्या. मात्र  यावेळी सत्तेत येण्यासाठी प्रबळ दावेदार बनलेल्या भाजपाला त्यावेळी एकही जागा जिंकता आली नव्हती.