शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Election Result Impact - आता बेनामी मालमत्तांवर येणार टाच?

By admin | Updated: March 11, 2017 12:56 IST

उत्तर प्रदेशमधला भाजपाचा विजय म्हणजे जनतेने मोदींच्या नोटाबंदीला दिलेला पाठिंबा मानला जात आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी कठोर उपाय योजण्याची ताकद मिळण्याची शक्यता आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - उत्तर प्रदेशमधला भाजपाचा विजय म्हणजे जनतेने मोदींच्या नोटाबंदीला दिलेला पाठिंबा मानला जात आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी कठोर उपाय योजण्याची ताकद मिळण्याची शक्यता आहे. नोटाबंदी केल्यानंतर मोदींनी आपण आणखी कठोर उपाय योजणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी बेनामी मालमत्ता, सोने खरेदीचे व्यवहार, विदेशी बँक खाती, राजकीय पक्षांना देणग्या आणि आयकराच्या जागी ट्रॅन्झॅक्शन टॅक्स अशा अनेक गोष्टींचा समावेश असू शकतो.
नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास झाला आणि त्याचा फटका उत्तर प्रदेश निवडणुकीत बसेल अशी अनेकांची अटकळ होती. मात्र, मोदींनी युपीच्या निवडणुकीची सुत्रे स्वत:च्या ताब्यात घेतली आणि अमित शहांच्या साथीने उत्तर प्रदेश पिंजून काढला. नोटाबंदीच्या मुद्याला स्पर्श करण्याचे टाळत त्यांनी लोकांनी विकासाची आश्वासने दिली, काही प्रमाणात मतांच्या ध्रुवीकरणाची वाट चोखाळली आणि अद्यापही सर्वसामान्यांच्या मनावर मोदींचं गारूड असल्याचं दिसून आलं.
या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचं दिसून आल्यामुळे मोदी साहसी पावले नजीकच्या काळात उचलतील आणि उच्चवर्ग व गरीब यांचा विचार केला तर आपण गरीबांच्या बाजुने असल्याचं दाखवण्याची संधी ते सोडणार नाहीत. साहजिकच बेनामी मालमत्ता, सोन्याची खरेदी आणि विदेशी बँकांमधील खाती यासारख्या प्रकरणामध्ये कठोर कायदे उचलली जाण्याची शक्यता आहे. मोदी नजीकच्या सहकाऱ्यांनाही त्यांच्या मनात काय आहे हे सांगत नाहीत. त्यामुळे अत्यंत अचानकपणे ते मोठा धक्का देऊ शकतात. उत्तर प्रदेशच्या निवडणूक निकालामुळे आता असे काही धक्के येत्या काळात बघायला मिळतील अशी शक्यता आहे.