शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

Election Result - केशवप्रसाद मौर्य होणार का उत्तर प्रदेशमधील भाजपाचे मुख्यमंत्री

By admin | Updated: March 11, 2017 10:52 IST

आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 203 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत.

ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 11 - आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 203 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत. त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री उत्तर प्रदेशमध्ये बनेल हे निश्चित आहे. पण कोण असेल उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री भाजपाचे युपी प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य, योगी आदित्यनाथ की सध्या केंद्रीय गृहमंत्री असलेले राजनाथ सिंहच बनतील पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री?
एग्झिट पोलमध्ये भाजपा बहुमताच्या जवळ पोचेल असा अंदाज बहुतेकांनी व्यक्त केला. तर चाणक्यने भाजपाला 303 जागांसह दणदणीत बहुमत मिळेल असा अंदाज  वर्तवला. चाणक्यचा अंदाज खरा ठरेल अशी चिन्हे आहेत. केशवप्रसाद मौर्य यांनीही भाजपाला दोन तृतीयांश जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. अखिलेश यादव यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागेल हे निश्चित आहे. समाजवादी पक्षाला सत्तेतून पायउतार व्हावे लागेल हे नक्की आहे.
मायावतींचेही पाचव्यांदा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न धुळीला मिळाले आहे. समाजवादी पार्टी व काँग्रेस आघाडीला 80 च्या आसपास जागा मिळतील, बसपाला 30 च्या आसपास जागा मिळतील आणि भाजपा 280 च्या आसपास धडक मारेल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे कोण असेल भाजपाचा मुख्यमंत्री अशी चर्चा झडायला सुरूवात झाली आहे.
उत्तरप्रदेशात भाजपा 1985 पासून निवडणूक लढवत आहे. पहिल्या निवडणुकीत भाजपाने 16 जागा जिंकल्या होत्या. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा 328 जागांवर आघाडीवर होती. नरेंद्र मोदींची ही लाट अद्यापही कायम असून भाजपा 280 हून जास्त जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात 26 वर्षांनी पुन्हा भाजपाला सत्ता मिळेल असं स्पष्ट होत आहे.