विधानसभेच्या रणसंग्रामासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी सुरू झाला असला तरी अद्याप निवडणूक कार्यालये राजकीय कार्यकर्त्यांविना ओस पडली आहेत. त्यांच्यासाठी उभारलेला शामियाना, ठेवलेल्या खुच्र्या रिकाम्या पडून आहेत. दोन दिवसांमध्ये या ठिकाणाहून एकूण सुमारे ४५ अर्ज नेण्यात आल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले. उमेदवारांची अर्ज भरण्याची प्रक्रिया कसल्याही गोंधळाविना सुरळीतपणे पार पडावी, यासाठी आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यालयात आवश्यक अधिकारी, कर्मचार्यांना प्रशिक्षण देऊन सज्ज ठेवण्यात आले आहे. मात्र इच्छुकांची गर्दी नसल्याने हा स्टाफ दिवसभर बसून राहिल्याचे चित्र आहे.
पितृपक्षामुळे निवडणूक कार्यालय ओस!
By admin | Updated: September 22, 2014 04:45 IST