नशिराबाद दूध उत्पादक संघाची निवडणूक बिनविरोध
By admin | Updated: March 14, 2016 00:21 IST
नशिराबाद : वार्ताहर
नशिराबाद दूध उत्पादक संघाची निवडणूक बिनविरोध
नशिराबाद : वार्ताहरनशिराबाद सहकारी दूध उत्पादक व पशुसंवर्धन सोसायटी लि. संघाची सातवी पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. त्यात गणपत सोमा पाटील यांची चेअरमनपदी तर नीलेश सुरेश रोटे यांची व्हॉईस चेअरमनपदी शनिवारी बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक अधिकारी संभाजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे संचालक आमदार सुरेश दामू भोळे यांच्या उपस्थितीत निवड झाली. संचालक निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य लालचंद पाटील, रमेश बोंडे यांनी माघार घेतल्याने बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. संचालक मंडळात आमदार सुरेश दामू भोळे, योगेश नारायण पाटील, प्रदीप रोटे, सतीश पंडित कावळे, प्रकाश बळीराम बोंडे, पितांबर हरी रोटे, घनशाम राजाराम माळी, प्रवीण दगडू खाचणे, वर्षा संजय महाजन, नयना प्रमोद पाटील, विनोद भगवान रंधे, भूषण विलास पाटील यांचा समावेश आहे.