पाटणा : आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणारा निवडणूक आयोग बिहारातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक भाषणांवरही नजर ठेवणार आहे.अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आर.लक्ष्मणन यांनी गुरुवारी ही माहिती दिली. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात गठित निवडणूक आचारसंहिता समिती पंतप्रधानांच्या भाषणांची समीक्षा करेल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी गुरुवारी मुंगेरसह बिहारच्या अन्य ठिकाणी केलेल्या निवडणूक भाषणांत ‘शैतान’, ‘यदुवंशी’ अशा शब्दांचा वापर केला.
पंतप्रधानांच्या भाषणांवर निवडणूक आयोगाची नजर
By admin | Updated: October 9, 2015 00:59 IST