शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बिहारचा निवडणूक आखाडाही तापला

By admin | Updated: July 7, 2015 23:23 IST

केंद्र सरकारने सामाजिक आणि आर्थिक चित्र स्पष्ट करणारी जनगणनेची माहिती जारी केली असली तरी जातनिहाय आकडेवारी रोखून ठेवल्याने बिहारमधील प्रचारादरम्यान नवा वाद उफाळला आहे.

पाटणा : केंद्र सरकारने सामाजिक आणि आर्थिक चित्र स्पष्ट करणारी जनगणनेची माहिती जारी केली असली तरी जातनिहाय आकडेवारी रोखून ठेवल्याने बिहारमधील प्रचारादरम्यान नवा वाद उफाळला आहे. जातनिहाय आणि अल्पसंख्याकांच्या संख्येसंबंधी आकडेवारी दडवून ठेवत सरकारने कट रचल्याचा आरोप मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चानेही (एचएएम) या मागणीत सूर मिसळत रालोआची अडचण वाढविली आहे.‘मार्च’ नेण्याचा इशारा केंद्र सरकारने जातनिहाय आकडेवारी जारी न केल्यास १३ जुलै रोजी पाटण्यातील राजभवनावर मार्च नेण्याचा इशारा लालूप्रसाद यादव यांनी दिला आहे. आपल्या जातीची लोकसंख्या किती हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही जातींसंबंधी वेगवेगळे दावे ऐकले आहेत. या जनगणनेतून नेमकी संख्या समोर येईल, असे ते दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. जनतेच्या मागणीनुसार ही आकडेवारी जारी करायला हवी. केंद्र सरकार ही आकडेवारी जारी का करीत नाही, हे माझ्या आकलनापलीकडचे आहे, असे नितीशकुमार यांनी सोमवारी म्हटले. (वृत्तसंस्था) एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न -भाजप४जातनिहाय आकडेवारी जारी करण्याची मागणी करीत राजद आणि जेडीयूने समाजातील सलोखा बिघडविण्याचे काम चालविले आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर यादव यांनी केला. ४पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विकासाकडे नेण्याची भाषा करीत असताना काही लोक जातीय राजकारणात तेल ओतत सामाजिक एकोपा बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.