शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

गृहराज्यमंत्र्यांच्या कार्यालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2015 00:15 IST

गृहराज्यमंत्र्यांच्या कार्यालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

गृहराज्यमंत्र्यांच्या कार्यालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
अकोला : सासर्‍याचा मृत्यू आणि पत्नीच्या गर्भपातास जबाबदार असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर करवाई करण्याच्या मागणीसाठी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या संपर्क कार्यालयात युवकाने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. युवकावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
संतोष भगत याचे सासरे प्रकाश अढाऊ हे २ एप्रिल रोजी अपघातात जखमी झाले. त्यांना सवार्ेपचार रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी उपचारास विलंब केल्याने, डॉक्टरांना जाब विचारला असता त्यांनी भगत यांच्या नातेवाईकांसोबत वाद घालून ४० ते ५० प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना बोलावून घेतले. नातेवाईक व डॉक्टरांमध्ये वाद वाढून प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी भगत यांची गर्भवती पत्नी कल्पना भगत हिला व नातेवाईकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. दरम्यान, भगत यांचे सासरे प्रकाश अढाऊ यांचा मृत्यू झाला. पत्नीला मारहाण झाल्याने तिचाही गर्भपात करावा लागला. दुसरीकडे पोलिसांनी मात्र संतोष भगत व त्यांच्या नातेवाइकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर मालमत्ता नुकसान कायद्यानुसार गुन्हे दाखल केले; परंतु त्यांना अटक केली नाही. सासर्‍याच्या मृत्यूस आणि पत्नीच्या गर्भपातास कारणीभूत ठरलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संतोष भगत यांनी केली होती. त्यानंतर भगत यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्याकडे तक्रारी केल्या़ परंतु कारवाई होत नसल्याने अखेर संतोष भगत यांनी पालकमंत्री पाटील यांच्या संपर्क कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब तेथे उपस्थित असलेले भाजपा कार्यकर्ते व भगत यांच्या नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला सवार्ेपचार रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)