शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

लाच प्रकरणी आपण सीबीआय चौकशीला तयार एकनाथ खडसे : छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By admin | Updated: May 16, 2016 00:44 IST

जळगाव : महसूल विभागाच्या जमिनीच्या बदल्यात गजनान पाटील नावाच्या व्यक्तीने ३० कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आपण स्वत: चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे सीबीआयच काय, त्यापेक्षा मोठी यंत्रणा चौकशी करण्यासाठी असल्यास त्याद्वारेसुद्धा चौकशी करण्यास आपली तयारी आहे. या प्रकरणाची आपल्याला देखील उत्सुकता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्णपणे छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जळगाव : महसूल विभागाच्या जमिनीच्या बदल्यात गजनान पाटील नावाच्या व्यक्तीने ३० कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आपण स्वत: चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे सीबीआयच काय, त्यापेक्षा मोठी यंत्रणा चौकशी करण्यासाठी असल्यास त्याद्वारेसुद्धा चौकशी करण्यास आपली तयारी आहे. या प्रकरणाची आपल्याला देखील उत्सुकता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्णपणे छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
खडसे म्हणाले, तक्रारदार डॉ.रमेश जाधव यांनी २००८ व २००९ मध्ये जमिनीच्या मागणीसाठी शासनाकडे अर्ज केला होता. मात्र तो अर्ज फेटाळला होता. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी तत्कालिन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यांनी सवार्ेच्च न्यायालयाचा दाखला देत जमीन देण्यास नकार दिला. तसेच २०१४ मध्ये ही जमीन परिवहन खात्याला देण्याबाबत आदेश दिले. त्या आशयाचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी देत ती जागा परिवहन खात्याकडे वर्ग केली.
दरम्यानच्या काळात डॉ.जाधव यांनी आपल्याकडेसुद्धा पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यात मागील मंत्री, अधिकारी यांनी संगनमत करीत जमीन नाकारल्याचा आरोप केला. महसूल मंत्री म्हणून आपल्याला अर्ध न्यायीकचा दर्जा आहे. ही जमीन गायरानाची आहे. जमीन परिवहन खात्याकडे वर्ग केली आहे. तसेच परिवहन विभागाने या जमिनीची ५ कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे भरणा केली असल्याने ही जमीन देता येत नसल्याचा निर्णय आपण २५ फेब्रुवारी रोजी दिला. हा निर्णय ठाणे जिल्हाधिकार्‍यांनी तक्रारदार यांना कळविला. त्यानंतर एप्रिल महिन्यात तक्रारदार यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप केला.
तक्रारदार हा विकृत
या प्रकरणात तक्रारदाराने सुरुवातीला १५ कोटींच्या लाचेची मागणीचा आरोप केला. नंतर ३० कोटी मागितल्याचा आरोप केला. रेडीरेकनरच्या दरानुसार ज्या जमिनीची किंमत ५ कोटी आहे. त्यासाठी ३० कोटींची मागणी होईल कशी। असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला. तक्रारदाराने केलेले आरोप व पूर्व इतिहास पाहता ती व्यक्ती विकृत असल्याचे लक्षात येते, असेही खडसे म्हणाले.
एक कोटीवर किती शून्य हे गजाननला माहित नाही
गजानन उर्फ गजमल पाटील हा मतदार संघातील व्यक्ती आहे. वारकरी असल्यामुळे आपल्यासोबत तो आषाढीच्या वारीमध्ये अनेकदा आला आहे. त्याची ओळख नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. गजानन याला एक कोटीवर किती शून्य आहे हे विचारल्यास सांगता येणार नाही असेही ते म्हणाले.

हेलिकॉप्टर सौद्याची चौकशीची मागणी केली असती तर आनंद

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी अशीच अगुस्ता वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर सौद्यांची किंवा अशोक चव्हाण यांनी केलेल्या आदर्श घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली असती तर आपल्याला आनंद झाला असता असे खडसे म्हणाले.