शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

आठ बंडखोर आमदारांचा राजीनामा

By admin | Updated: February 22, 2016 03:41 IST

तामिळनाडू विधानसभेतील डीएमडीकेच्या आठ बंडखोर आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचे राजीनामे दिले. हे आठही आमदार आता सत्तारूढ अण्णाद्रमुकमध्ये सामील होणार आहेत.

चेन्नई : तामिळनाडू विधानसभेतील डीएमडीकेच्या आठ बंडखोर आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचे राजीनामे दिले. हे आठही आमदार आता सत्तारूढ अण्णाद्रमुकमध्ये सामील होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या राजकीय घडामोडीमुळे विजयकांत यांना आपले विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागले आहे. या आठ आमदारांनी विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांच्याकडे राजीनामे सादर केले.आणि अध्यक्षांनी हे राजीनामे तात्काळ मंजूर केले. विजयकांत यांच्या डीएमडीकेचे २८ आमदार होते. आठ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे ही संख्या २० वर आली आहे आणि विजयकांत यांना विरोधी पक्षनेतेपदही गमवावे लागले आहे.विधानसभेच्या नियमानुसार आता डीएमडीकेचे संस्थापक विजयकांत हे विरोधी पक्षनेतेपदासाठी पात्र असणार नाहीत. तसेच विधानसभेत कोणत्याही विरोधी पक्षाकडे २४ आमदार नसल्याने आता सभागृहात मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेता असणार नाही, असे विधानसभा अध्यक्षांच्या सचिवालयाने म्हटले आहे. २३४ सदस्यीय विधानसभेत द्रमुकजवळ २३ आमदार आहेत. सी. अरुण पांडियन, एम. अरुम सुब्रह्मण्यम, के. पांडियाराजन, के. तामिळ अझगन, एस. मिशेल रायप्पन, आर. सुंदरराजन, टी. सुरेश कुमार व आर. संथी अशी डीएमडीकेच्या आमदारांची नावे आहेत. (वृत्तसंस्था)