शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

भारतातील गोरगरीब व अल्पवयीन मुलींशी कंत्राटी विवाह करणा-या रॅकेटमधील आठ अरब शेख अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 04:02 IST

भारतातील गोरगरीब व अल्पवयीन मुलींशी ‘कंत्राटी विवाह’ करून उपभोगानंतर त्यांना वा-यावर सोडून देण्याच्या रॅकेट बुधवारी उद्ध्वस्त करताना हैदराबाद पोलिसांनी मुली निवडण्यासाठी शहरात मुक्काम ठोकलेल्या आठ अरब शेखना अटक केली.

हैदराबाद: भारतातील गोरगरीब व अल्पवयीन मुलींशी ‘कंत्राटी विवाह’ करून उपभोगानंतर त्यांना वा-यावर सोडून देण्याच्या रॅकेट बुधवारी उद्ध्वस्त करताना हैदराबाद पोलिसांनी मुली निवडण्यासाठी शहरात मुक्काम ठोकलेल्या आठ अरब शेखना अटक केली.पोलीस आयुक्त एम. महेंद्र रेड्डी यांनी सांगितले की, शहराच्या फलकनुमा व चंद्रयानगुट्टा भागातील अनेक लॉज व गेस्ट हाऊसवर छापे टाकून या अरब नागरिकांना अटक करण्यात आली. यात ओमानचे पाच तर कतारचे तीन नागरिक आहेत. आपल्या विकृत लैंगिक सुखासाठी निष्पाप कोवळ््या मुलींचा बळी घेण्यासाठी आलेल्या या अरबांमध्ये दोघे ८० वर्षांचे असून ते काठी वॉकर घेतल्याशिवाय चालू शकत नाहीत. अटक केलेल्यांमधील एक अरब नागरिक तर अंध आहे.ज्यांनी आपण ‘कंत्राटी विवाह’ करण्यासाठी आल्याचे कबूल केले त्यांना अटक केली गेली. याखेरीज लॉज व गेस्ट हाऊसमध्ये राहणाºया इतर अरबांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या ‘विवाहेच्छु’ अरबांखेरीज प्रत्येकी ५० हजार रुपये घेऊन त्यांचे बनावट निकाह लावून देणारे मुंबईचे मुख्य काझी फरीद अहमद खान यांनाही पोलिसांनी अटक केली. गेल्या काही दिवसांत अरबांचे असे ‘निकाह’ लावलेल्या दोन स्थानिक काझींनाही जेरबंद केले.पोलिसांनी लॉज व गेस्ट हाऊसवर धाडी टाकल्या, तेव्हा या अरबांच्या ‘निवडीसाठी’ आणलेल्या २० अल्पवयीन मुलीही तेथे होत्या. त्यांची पोलिसांनी सुटका केली. मंगळवारी सुरू झालेल्या धाडी बुधवारपर्यंत सुरु होत्या. हे अरब जेथे मुक्कामाला होते, त्या सर्व लॉज व गेस्ट हाऊसना सील ठोकण्यात आले. चंद्रयानगुट्टा भागातील एका गेस्ट हाऊसमध्ये तर ओमानच्या ७० वर्षाच्या अरबाशी १५ वर्षाच्या मुलीचा ‘निकाह’ लावणे सुरू असतानाच पोलीस पोहोचले.अशाच प्रकारे ‘कंत्राटी’ विवाह केलेल्या ओमानच्या एका शेखला १८ आॅगस्ट रोजी अटक झाली होती. त्यानंतर पोलिसांनी हैदराबाद विमानतळावर येणाºया अरब नागरिकांवर नजर ठेवणे सुरू केले.>दलाल, लॉजवालेही सामीलया रॅकेटमध्ये दलाल व लॉजवालेही सामील आहेत. शहरातील अशा ३५ दलालांचा पोलिसांनी छडा लावला आहे. या धाडीत त्यापैकी तिघांना अटक केली गेली. लग्नासाठी मुलगी उपलब्ध करून देणे, लॉजवर राहण्याची सोय करणे, निकाह लावून देणे अशा ‘पॅकेज’चे ते अरबांकडून १० ते ३० लाख रुपये घेतात, असे समजते. त्यापैकी फारच थोडी रक्कम मुलींच्या आई-वडिलांना दिली जाते.