शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

दोन ज्येष्ठ वैज्ञानिकांना शिक्षा

By admin | Updated: September 26, 2014 03:36 IST

मंगळयानाच्या यशामुळे वैज्ञानिक मंडळींवर स्तुतीसुमने उधळली जात असताना सरकारी यंत्रणेत प्रशासनाचेही काम करणारे वैज्ञानिक धास्तावले आहेत.

चेन्नई : नोकरीतून कमी केलेल्या एका कर्मचा-यास पुन्हा कामावर घेण्याचे आदेश पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत होऊनही त्याचे पालन करण्यात १० वर्षे टाळाटाळ केल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) दोन ज्येष्ठ वैज्ञानिकांना कारावासाची आणि दंडाची शिक्षा ठोठावली. मंगळयानाच्या यशामुळे वैज्ञानिक मंडळींवर स्तुतीसुमने उधळली जात असताना सरकारी यंत्रणेत प्रशासनाचेही काम करणारे वैज्ञानिक धास्तावले आहेत.आवाडी, चेन्नई येथील ‘कॉम्बॅट व्हेईकल्स रीसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ २००१ मध्ये बंद केल्यानंतर कामावरून कमी केल्या गेलेल्या जोसेफ राज या कारकुनाने केलेल्या अवमान याचिकेवर न्या. एस. राजेश्वरन व न्या. पी. एन. प्रकाश यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. त्यानुसार ‘डीआरडीओ’चे महासंचालक व संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व्ही. के. सारस्वत व ‘डिफेन्स मेट्रलर्जिकल रीसर्च लॅबोरेटरी’चे संचालक जी. मलकोंडय्या यांना प्रत्येकी तीन आठवड्यांची साधी कैद आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. खंडपीठाने नमूद केले की, हे दोघेही वैज्ञानिक सरकारमध्ये उच्च पदांवर आहेत, याची आम्हाला कल्पना आहे. परंतु पदांच्या खुर्चीमुळे त्यांची दृष्टी धूसर झाली असून, स्वत:ची काहीही चूक नसूनही अचानक नोकरीतून काढून टाकल्या गेलेल्या एका सामान्य कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था त्यांना दिसू शकली नाही. एवढेच नव्हे तर ही अवमानाची कारवाई सुरु झाल्यावरही त्यांनी जराही पश्चात्ताप दाखविला नाही.