शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कार्ती चिदंबरम यांच्या संपत्तीवर ‘ईडी’ची टाच! १.६६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 02:04 IST

एअरसेल-मॅक्सिस व्यवहारातील मनी लाँड्रिंगच्या तपास प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम आणि कथितरीत्या त्यांच्याशी संबंधित एक कंपनीच्या १.६६ कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.

नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्सिस व्यवहारातील मनी लाँड्रिंगच्या तपास प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम आणि कथितरीत्या त्यांच्याशी संबंधित एक कंपनीच्या १.६६ कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.ईडीने स्पष्ट केले आहे की, बचत खाते आणि मुदत ठेवींच्या रूपातील ९० लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक अधिनियमानुसार (पीएमएलए) याबाबतचा अस्थायी आदेश जारी करण्यात आला आहे. अ‍ॅडव्हान्टेज स्ट्रॅटेजिक कन्स्लटिंग प्रा. लि. च्या (एएससीपीएल) नावे असलेली २६ लाखांची एक मुदत ठेवही जप्त करण्यात आली आहे. ही कंपनी कथितरीत्या कार्ती यांच्याशी संबंधित आहे आणि अन्य एका व्यक्तीच्या माध्यमातून कार्ती यांच्याकडून त्याचे नियंत्रण होते, असा दावाही ईडीने केला आहे.कार्ती यांनी गुडगाव येथील एक प्रॉपर्टी निकाली काढली आणि जप्तीची प्रक्रिया विफल करण्यासाठी काही बँक खाती बंद केली तसेच काही बँक खाती बंद करण्याचा प्रयत्न केला. एअरसेल-मेक्सिस प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याची दखल घेत ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे.कार्तीच्या मालमत्तेवर टाच आणण्यासंबंधी ‘ईडी’ने काढलेले प्रसिद्धिपत्रक हे खोटारडेपणा व कपोलकल्पित आरोपांचे वेडगळ मिश्रण आहे. मला धमकावण्याचा व माझा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. पण मी त्याला बधणार नाही. सादर झालेले एकमेव आरोपपत्र न्यायालयाने रद्द करूनही ही कारवाई कशी केली जाऊ शकते, या मुद्द्याला ‘ईडी’ने सोयीस्करपणे बगल दिली आहे. प्रत्यक्ष टाचेची नोटीस मिळाल्यावर तिला कायदेशीर आव्हान दिले जाईल. - पी. चिदंबरम,माजी केंद्रीय वित्तमंत्री