शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

‘ईडी’ने मल्ल्यांभोवतीचा फास आवळला

By admin | Updated: March 12, 2016 04:42 IST

मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी लंडनला बस्तान हलविल्याचे वृत्त बाहेर येताच विरोधकांनी संसदेत चौफेर हल्ले चढवत सरकारची केलेली कोंडी पाहता तपास संस्थांनी मल्ल्यांच्या नाड्या आवळायला सुरुवात केली

नवी दिल्ली : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी लंडनला बस्तान हलविल्याचे वृत्त बाहेर येताच विरोधकांनी संसदेत चौफेर हल्ले चढवत सरकारची केलेली कोंडी पाहता तपास संस्थांनी मल्ल्यांच्या नाड्या आवळायला सुरुवात केली आहे. शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ६० वर्षीय मल्ल्या यांना १८ मार्च रोजी व्यक्तिश: हजर होण्याबाबत समन्स बजावला. १७ बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्यामुळे चर्चेत आलेल्या मल्ल्या यांनी पळून गेल्याचा इन्कार केला. मी आंतरराष्ट्रीय व्यावसायिक आहे. माझे विदेशात आणि भारतात येणे-जाणे सुरू असते. मी पळून गेलेलो नाही. मी फरारही नाही. तसा आरोप करणे खोडसाळपणाचे आहे, असे टिष्ट्वट त्यांनी अज्ञात स्थळाहून केले.दुसरीकडे मल्ल्यांच्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सने आयडीबीआय बँकेचे ९०० कोटी रुपये बुडविल्याप्रकरणी कंपनीच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्याची ईडीने कसून चौकशीही केली. मल्ल्यांना ईडीच्या तपास अधिकाऱ्यांसमक्ष हजर व्हायचे आहे. आयडीबीआय प्रकरणी ईडीने काळा पैसा प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदीनुसार समन्स बजावला आहे. त्यांना वैयक्तिक आर्थिक व्यवहारासंबंधी कागदपत्रे सादर करण्याचा आदेशही दिला.बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचे माजी मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) रघुनाथन यांची ईडीने बल्लार्ड पीयर भागातील कार्यालयात चौकशी केल्यानंतर मल्ल्यांना समन्स पाठविण्यात आला. विविध आर्थिक व्यवहारावर प्रकाश टाकणे महत्त्वाचे असल्यामुळे रघुनाथन यांना प्रश्न विचारणे आवश्यक होते, असे ईडीच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. अधिकारीही अडकलेईडीने आयडीबीआय बँक आणि किंगफिशर एअरलाईन्सच्या अर्ध्या डझनावर अधिकाऱ्यांना समन्स पाठवले असून सर्वांना वैयक्तिक आर्थिक व्यवहार, तसेच गत पाच वर्षांतील आयकर रिटर्नबाबत माहिती मागितली आहे. आयडीबीआयचे माजी सीएमडी योगेश अगरवाल आणि अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही समन्स बजावण्यात आले आहे.आझाद यांचा सवाल लूक आऊट नोटीसमध्ये बदल का केला राज्यसभेत शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही मल्ल्यांचा मुद्दा गाजला. गेल्यावर्षी सीबीआयने एकाच महिन्यात मल्ल्यांविरुद्धच्या लूक आऊट नोटीसमध्ये बदल का केला? असा सवाल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी शून्य तासाला केला. मल्ल्या देश सोडून जाणार असतील तर त्यांना ताब्यात घ्यावे असा आदेश सीबीआयने आॅक्टोबर २०१५ मध्ये लूक आऊट नोटिशीत दिला होता. नोव्हेंबरमध्ये या आदेशात बदल करण्यात आला. ते देश सोडून गेल्यास केवळ माहिती दिली जावी असा तो बदल होता. सीबीआय नोटीसमध्ये बदल करण्याची गरज का भासली, असेही त्यांनी म्हटले.>> मी भारतीय खासदार, मी पळून गेलेलो नाही - मल्या मी भारतीय खासदार आहे. मी देशाच्या कायद्याचे पालन आणि आदर करतो. आपली न्यायालयीन व्यवस्था सुदृढ आणि आदरणीय आहे, मात्र प्रसिद्धी माध्यमांनी ‘मीडिया ट्रायल’ चालवू नये. प्रसिद्धी माध्यमांनी आग भडकवली की सत्य आणि तथ्यांची जळून राख होते.  मीडिया बॉसेसना मी अनेक वर्षे केलेली मदत, ठेवलेली मेहेरनजर, विमान प्रवासासारख्या सवलती विसरता येणार नाही. आता त्यांनी टीआरपीसाठी खोटे बोलू नये, असेही मल्ल्यांनी म्हटले. मल्ल्यांनी संपत्ती घोषित करावी या वृत्तावर ते भडकले. बँकांना माझी संपत्ती माहीत नाही काय? माझा संसदेत सादर केलेला संपत्तीचा तपशील बघावा, असेही ते म्हणाले.भारतातून अचानक लंडनला निघून गेलेले विजय मल्ल्या यांनी आपण पळून गेलेलो नाही आणि या देशाच्या कायद्याचे आपण पालन व आदर करतो, असे ट्विट केले आहे. दरम्यान, ईडीने किंगफिशर एअरलाइन्सचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ए. रंगनाथन यांची कसून चौकशी केली. एअरलाइन्स सुरू करण्यासाठी घेतलेल्या कर्जांचा कसा वापर केला, हे जाणून घेणे हा या चौकशीचा उद्देश होता. कर्जातील मोठी रक्कम परदेशात गेली असावी, असे ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रतिनिधीला सांगितले.