ईडीची कारवाई : जगनमोहन यांची ५३ कोटींची मालमत्ता जप्त
By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST
हैदराबाद : वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष वाय. एस. जगनमोहन रेड्डी सामील असलेल्या नुकसानभरपाई (क्विड-प्रो-क्वो) गुंतवणूकप्रकरणात सक्तवसुली महासंचालनालयाने (ईडी) सोमवारी इंदू प्रोजेक्ट लिमिटेड या खासगी कंपनीशी संबंधित असलेली ५३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.
ईडीची कारवाई : जगनमोहन यांची ५३ कोटींची मालमत्ता जप्त
हैदराबाद : वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष वाय. एस. जगनमोहन रेड्डी सामील असलेल्या नुकसानभरपाई (क्विड-प्रो-क्वो) गुंतवणूकप्रकरणात सक्तवसुली महासंचालनालयाने (ईडी) सोमवारी इंदू प्रोजेक्ट लिमिटेड या खासगी कंपनीशी संबंधित असलेली ५३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.मेसर्स इंदू प्रोजेक्ट लिमिटेडचे प्रबंध संचालक इंदुकुरी श्यामप्रसाद रेड्डी यांच्याविरुद्ध सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारावर ईडीच्या हैदराबादेतील क्षेत्रीय कार्यालयाने जगनमोहन, आय. श्याम आणि अन्य लोकांविरुद्ध मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर ५३ कोटींच्या तीन अचल मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत तेलंगणच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील मेसर्स इंदू टेक्नोझोन प्रा. लि.च्या मालकीची १५० एकर जमीन, मेसर्स एसपीआर प्रापर्टिज प्रा. लि.च्या मालकीची १०० एकर जमीन आणि मेसर्स इंदू प्रोजेक्ट लि. आणि मेसर्स वाल्डन प्रॉपर्टिज पा. लि. यांच्यादरम्यान विक्रीपत्र झालेल्या २८३५ चौरस यार्ड जमिनीचा समावेश आहे.विविध खासगी कंपन्या आणि व्यक्तींनी जगनमोहन रेड्डी यांच्या व्यवसायात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याच्या संदर्भात ईडीने ११ आरोपपत्र दाखल केलेले आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये ईडीने जगनमोहन रेड्डी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ८६३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. (वृत्तसंस्था)