ेक्राईम सारांश
By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST
ेक्राईम सारांश
ेक्राईम सारांश
ेक्राईम सारांशपाण्याच्या टाकीत महिलेचा मृतदेह आढळलानागपूर : नळाच्या टाकीच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. भारती हनुमंतराव घोसेवान (४५) रा. विद्यानगर, वाठोडा ले आऊट यांचे प्रेत कंपाऊंड वॉलजवळच्या नळाच्या टाकीच्या पाण्यात तरंगताना आढळले. औषध प्राशन केल्यामुळे मृत्यूनागपूर : औषध प्राशन केल्यामुळे एका २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दीपक पांडुरंग नाकतोडे (२८) रा. गोपालकृष्णनगर, पांडे किराणा स्टोअर्सजवळ या युवकाने आपल्या राहत्या घरी कोणतेतरी औषध प्राशन केले. त्यास उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.शुक्रवार तलावात मृतदेहनागपूर : शुक्रवार तलावात एका २२ वर्षाच्या युवकाचा मृतदेह आढळल्याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्रफुल्ल नारायण वानखेडे (२२) रा. श्रीरामवाडी, अयोध्यानगर, आदर्श मंगल कार्यालयाजवळ या युवकाचा मृतदेह शुक्रवारी तलावाच्या पाण्यात तरंगताना गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आढळला. पाचव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्यानागपूर : ७२ वर्षाच्या वृद्ध महिलेेने पाचव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. इंद्रजितकौर ज्ञानसिंग नय्यर (७२) रा. बाबा संतोष आश्रम, तळमजला, लष्करीबाग यांनी गुरुवारी रात्री ८ वाजता आश्रमाच्या पाचव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. यादव संभाजी धाकडे (६२) रा. बाबा दिपसिंग नगर जरीपटका यांच्या सुचनेवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.कुख्यात गुंडाविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाईनागपूर : गंभीर दुखापत करणे, अश्लील शिवीगाळ करणे, दरोडा घालणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आदी गुन्हे सुरूच ठेवल्यामुळे कुख्यात गुंड कुलदिप ऊर्फ पिन्नु शशीधर पांडे (२४) रा. सुरजनगर, अयप्पा मंदिराजवळ याच्या स्थानबद्धतेची कारवाई पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी केली आहे.