शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पॅन कार्डशी आधार जोडण्यासाठी प्राप्तिकर विभागाची "ई" शक्कल

By admin | Updated: May 11, 2017 18:25 IST

प्राप्तिकर विभागानं पॅन कार्डला आधारशी जोडण्यासाठी नवी ई- सुविधा अस्तित्वात आणली आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 11 - प्राप्तिकर विभागानं पॅन कार्डला आधारशी जोडण्यासाठी नवी ई- सुविधा अस्तित्वात आणली आहे. या ई-सुविधेमुळे प्राप्तिकर परतावा भरताना तुमच्या पॅन कार्डसोबत आधार कार्डही नंबरही प्राप्तिकर विभागाला मिळणार आहे. प्राप्तिकर विभागाची ई-फायलिंग वेबसाइट https://incometaxindiaefiling.gov.in च्या होमपेजवर नवी लिंक सुरू करण्यात आली आहे. या लिंकच्या आधारे कोणत्याही व्यक्तीला पॅन कार्डशी आधारला जोडण्यास सहजशक्य होणार आहे. या लिंकवर गेल्यानंतर व्यक्तीला स्वतःचा पॅन आणि आधार नंबर देऊन आधार कार्डवरच नाव टाकावं लागणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं त्या व्यक्तीच्या नावाची आणि माहितीची खातरजमा केल्यानंतर त्या व्यक्तीचे पॅन कार्ड आधार कार्डशी जोडले जाणार आहे. जर त्यात काही व्यत्यय अथवा त्रुटी आढळल्यास आधारशी जोडण्यात आलेल्या मोबाईलवरून तुम्हाला वन टाइम पासवर्ड पाठवण्यात येणार आहे. त्याद्वारे तुम्ही पॅन कार्ड किंवा आधार कार्डमधील माहिती दुरुस्तही करू शकता. या ई-सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. या ई-सुविधेचा कोणतीही व्यक्ती वापर करू शकते. कोणत्याही त्रासापासून वाचवण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्डवरची जन्मतारीख एकसमान असणं गरजेचं आहे.
तत्पूर्वी पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर प्रश्नांचा मारा केला होता. सरकारने आपली बाजू मांडताना स्पष्ट केले होते की, बनावट कंपन्यांच्या नावे रक्कम वळती करण्यासाठी बनावट पॅन कार्डचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.
 
अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सांगितले होते की, सरकारला आढळून आले आहे की, बनावट रेशन कार्ड आणि दुसऱ्या कागदपत्रांच्या आधारे अनेक बनावट पॅन कार्ड मिळविण्यात आली आहेत. त्याचा उपयोग बनावट कंपन्यांना पैसा देण्यासाठी होत होता. एका व्यक्तीकडे अनेक पॅन कार्ड असल्याचे दिसून आले. त्यामुळे पॅन कार्डच्या अर्जासाठी आधार अनिवार्य करण्यात आले आहे.