शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या काळात मानवी हक्कांचे 'बुरे दिन'

By admin | Updated: February 25, 2015 12:58 IST

नरेंद्र मोदींचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन होण्याचे प्रकार वाढले आहे असा दावा अॅमनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. २५ - नरेंद्र मोदींचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन होण्याचे प्रकार वाढले आहे असा दावा अॅमनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने केले आहे. मोदी सरकारच्या भूमी अधिग्रहण अध्यादेशामुळे हजारो भारतीयांना धोका निर्माण झाला आहे असे परखड मतही अॅमनेस्टी इंटरनॅशनलने मांडले असून अॅमनेस्टीच्या अहवालामुळे मोदी सरकारची नाचक्की झाली आहे. 

अॅमनेस्टी इंटरनॅशनल या मानवी हक्कांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेने २०१५ चा वार्षिक अहवाल नुकताच सादर केला. यामध्ये भारताच्या सद्य स्थितीवरुन मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या दंगली, ख्रिश्चन व मुसलमांना बळजबरीने हिंदू धर्म स्वीकारायला लावणे या घटनांवर अॅमनेस्टी इंटरनॅशनलने चिंता व्यक्त केली आहे.  याशिवाय भूमी अधिग्रहण अध्यादेशावरही अॅमनेस्टीने आक्षेप घेतला आहे. भूमी अधिग्रहण विधेयकात त्याच्या सामाजिक परिणामांचा विचारच केला गेला नाही. या विधेयकामुळे हजारो भारतीयांना त्यांच्या घर व जमिनीवर पाणी सोडावे लागेल अशी भितीही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. या विधेयकाचा प्रमुख फटका खाण, धरणाजवळ राहणा-या आदिवासी समाजालाच बसेल असे अॅमनेस्टीने म्हटले आहे. सरकारी अधिका-यांकडून व्यक्ती स्वातंत्र्यांचे उल्लंघन होत आहे असा उल्लेखही अहवालात आहे. 

अहवालात मोदी सरकारच्या कामाचे कौतुकही करण्यात आली आहे. सुशासन आणि विकासाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने गोरगरिबांपर्यंत सरकारी निधी पोहोचवण्याची कटीबद्धता दाखवून दिली असे कौतुक अॅमनेस्टीच्या अहवालात करण्यात आले.