एसएनडीएलच्या निलंबित कर्मचाऱ्यांचे धरणे
By admin | Updated: February 7, 2015 02:05 IST
फोटो आहे...
एसएनडीएलच्या निलंबित कर्मचाऱ्यांचे धरणे
फोटो आहे...नागपूर : वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएल कंपनीने निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांनी रिझर्व्ह बँक चौकात धरणे आंदोलन पुकारले आहे. शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शुक्रवारी रविभवन येथे भेट घेऊ न ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रकरणावर तोडगा काढण्याची सूचना करावी, अशी विनंती केली.खर्चात कपात करण्यासाठी एसएनडीएल कंपनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करीत आहे. एका विभाग कार्यालयात २५ कर्मचारी होते. आता ही संख्या अर्ध्यावर आली आहे. भविष्यात आणखी कपात करण्याची शक्यता आहे. निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत पूर्णपणे समावून घ्यावे, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे. ...फोटो आहे... नोकरीत पुन्हा समावून घ्यावे, यासाठी रिझर्व्ह बँक चौकात आंदोलनात सहभागी निलंबित एसएनडीएल कर्मचारी.