शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

रिक्षातून धूर निघाल्याने जीव वाचविण्यासाठी विद्यार्थिनीने घेतली उडी महामार्गावर ट्रक खाली चिरडून ठार : डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरेपी कॉलेजची विद्यार्थिनी; वाशिमची रहिवासी; इतर

By admin | Updated: December 18, 2015 00:28 IST

सेंट्रल डेस्क व हॅलो ग्रामीणसाठी

सेंट्रल डेस्क व हॅलो ग्रामीणसाठी

जळगाव : धावत्या रिक्षामधून अचानक धूर निघू लागल्याने घाबरलेल्याअश्विनी राजू पाटील (२१, रा. मंगरुळपीर, जि. वाशिम) या विद्यार्थिनीने उडी घेतल्याने राष्ट्रीय महामार्गावरील ट्रक खाली येऊन ती जागीच ठार झाली. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेसात वाजता गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय ते जळगाव दरम्यान हातेड नाल्याजवळ झाला. अपघातानंतर ट्रक व रिक्षा दोन्हीही पसार झाले. इतर प्रवाशांनीही रिक्षातून उडी घेतली मात्र ते सुदैवाने बचावले.

फिजीओथेरपीच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी
१. अश्विनी पाटील ही डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरपीच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी असून ती या महाविद्यालयाच्याच वस्तीगृहात राहत होती. गुरुवारी गावाकडे जाण्यासाठी ती एका रिक्षाने जळगावला यायला निघाली.

२. रिक्षा पुढे आल्यानंतर त्यामधून अचानक धूर निघू लागला. रिक्षाला आग लागली की काय? या भीतीने प्रवाशांनी खाली उड्या घेतल्या. यामध्ये अश्विनीनेदेखील उडी घेतली.

३. चालकाच्या बाजूने उडी घेतल्याने मागून येणार्‍या ट्रक खाली ती आली. यात तिच्या चेहर्‍यावरुन ट्रकचे चाक गेले व ती जागीच गतप्राण झाली. शरीराला कोठेही इजा झालेली नसून चेहराच पूर्णपणे चेंदामेंदा झाला.

ट्रक, रिक्षा पसार
अपघातानंतर रिक्षाचालक, ट्रकचालक पसार झाले. इतकेच नव्हे ज्या प्रवाशांनी रिक्षातून उडी घेतली तेही प्रवासी तेथून निघून गेले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले व त्यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला.