शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

पावसामुळे जीप ५०० फूट दरीत कोसळली, १० ठार

By admin | Updated: July 3, 2016 13:03 IST

उत्तराखंडमध्ये शनिवारी रात्री जीप दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० जण ठार झाले. मुसळधार पावसामुळे ही जीप दरीत कोसळली.

ऑनलाइन लोकमत 

डेहराडून, दि. ३ - उत्तराखंडमध्ये शनिवारी रात्री जीप दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० जण ठार झाले. मुसळधार पावसामुळे ही जीप दरीत कोसळली. उत्तराखंडमध्ये पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये मरण पावणा-यांचा आकडा आता २५ पर्यंत पोहोचला आहे. डोंगराळ प्रदेश असलेल्या उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस कोसळत आहे. 
 
यामुळे विविध ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे रस्ते वाहतूक बंद झाली आहे. जीप चालक उखडलेल्या रस्त्यावरुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचे नियंत्रण सुटले व जीप ५०० फूट खोल दरीत कोसळली. रात्री साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 
 
पण  जिल्हा प्रशासनाला पहाटे पाचवाजता या घटनेची माहिती मिळाली. सरकारी मदत पथक पोहचण्याआधीच जवळच्या खुना गावातील स्थानिकांनी मदतकार्य सुरु केले होते. जीपमध्ये एकूण १४ प्रवासी होते. दोन जखमींना नजीकच्या विकासनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघे अजून बेपत्ता असून, अन्य दहा प्रवाशांचा मृत्यू झाला.