शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या बातमीचा जोड़़़़़

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

जिल्‘ात ४१२ टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यात ४१२ टँकरने पाणीपुरवठा
मागीलवर्षी जिल्ह्यात ३६९ टँकरव्दारे २८५ गावे व १ हजार २१७ वाड्या वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता़ वर्षभरात ऑक्टोबर वगळता ११ महिने टँकर सुरू असून, यंदा टँकरची संख्या ४१२ वर पोहोचली आहे़ जिल्ह्यातील अकोले व श्रीरामपूर आणि राहुरी वगळता ११ तालुक्यांत टँकर सुरू असून, ६ लाख ८६ हजार ३८७ नागरिक टँकरचे पाणी पितात़
टँकर कुठे किती
संगमनेर-२६, कोपरगाव-१, नेवासे-१९, राहाता-१, नगर-३४, पारनेर-६७, पाथर्डी-८५, शेवगाव-४६,कर्जत-५४, जामखेड-३५, श्रीगोंदा-२०, कर्जत नगरपंचायत-१२
़़़़
दक्षिण नगर जिल्ह्यात भीषण टंचाई
दक्षिण नगर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ दक्षिणेतील कर्जत, पारनेर, जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यात एकूण १९७ टँकर सुरू आहेत़ या परिसरात टँकर भरण्यासाठीदेखील पाणी शिल्लक नव्हते़ त्यामुळे कुकडी प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आले आहे़ त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी मार्गी लागला आहे़
़़़़़
२ लाख ६१ हजार हेक्टरवरील खरीप धोक्यात
जिल्ह्यात गतवर्षी खरिपाची १७ टक्के पेरणी झाली होती़ यंदा खरिपाच्या पेरणीत कमालीची वाढ झाली असून, ६३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे़ जिल्ह्यात मूग, उडीद, बाजरी, तूर, कापूस, मका, कांदा आणि ऊस, यासारखी पिके आहेत़ एकूण २ लाख ६१ हजार ८०३ हेक्टरवर पिकांची पेरणी करण्यात आली आहे़ जूनमध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाला़ पेरणी योग्य पाऊस झाल्याने पेरणी वाढली झाली खरी, पण गेल्या दोन महिन्यात पाऊस पडला नाही त्यामुळे खरिपाचे पीक धोक्यात आले आहे़
कुठे किती पेरणी (टक्केवारीत)
नगर-८३़ २९, पारनेर-४५़९, श्रीगोंदा-१२०़ ३५, कर्जत-९२़९१, जामखेड-१२९़८१, शेवगाव-५१़०१, पाथर्डी-५०़३२, नेवासे-७४़८८, राहुरी-५१़७,संगमनेर-६२़५१, अकोले-५८़२४,कोपरगाव-३५़६२, श्रीामपूर-३६़ ७६, रहाता-८६़ ८६
़़़़़
अवकाळी पावसाचा तडाखा
गेल्या फेबु्रवारी ते मार्च या काळात अवकाळी पावसाने हजेरी लावली़या पावसामुळे ८९ हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली़ आधीच दुष्काळ त्यात पाऊस पडल्याने पिके वाया गेली़ जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याने पिके वाया गेली आहेत़
़़़़़
टँकरची स्थिती
२००२ ते २०१५
२००२-१३१, ०३-३७७, ०४- ६१९, ०५- १९२, ०६-२२३, ०७-४८, ०८-१२९, ०९-८८, १०-५२, ११-२२, १३-७०७, १२-२८९, १४-३६९, १५-४१२