मुंडे संपर्क प्रमुख झाल्याने पक्ष बळकट होईल
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी पक्षाच्या जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा केली आहे. यात नागपूर व वर्धा जिल्ह्याची जबाबदारी विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासारख्या युवा नेतृत्वाकडे सोपविली आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात पक्ष बळकट होईल. असा विश्वास पक्षाचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री देवेंद्र ...
मुंडे संपर्क प्रमुख झाल्याने पक्ष बळकट होईल
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी पक्षाच्या जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा केली आहे. यात नागपूर व वर्धा जिल्ह्याची जबाबदारी विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासारख्या युवा नेतृत्वाकडे सोपविली आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात पक्ष बळकट होईल. असा विश्वास पक्षाचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्याची जबाबदारी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांवर सोपविल्याने त्यांचा प्रशासनावर वचक राहील. तसेच पक्षाला संघटन बांधणीसाठी मदत होईल. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात पक्ष वाढेल. कार्यर्त्यात उत्साह निर्माण होईल. असा त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)